आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sachin Tendulkar In Parliament Because Of Sonia Gandhi, Says Rajeev Shukla

कॉंग्रेसची रणनिती; सोनिया गांधींमुळे सचिन संसदेत, मिळू शकतो \"भारतरत्न\"

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या शिफारशीमुळे मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरला राज्यसभेचे सदस्यत्व देण्यात आले, अशी माहिती भारतीय क्रिकेट नियामक मंडळचे (बीसीसीआय) उपाध्यक्ष राजीव शुक्ला यांनी दिली आहे. निवृत्तीनंतर सचिनला "भारतरत्न" या सर्वोच्च नागरी पुरस्काराने गौरविण्यात येण्यावरही विचार होऊ शकतो, असेही शुक्ला यांनी सांगितले आहे.
आगामी विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीत सचिन तेंडुलकरला कॉंग्रेसकडून प्रचारात उतरविण्यात यावे, असा प्रस्ताव कॉंग्रेसच्या एका समितीकडून सादर करण्यात आला होता. परंतु, सचिनने कॉंग्रेसचा प्रचार करण्यास चक्क नकार दिला होता. यावरून बरेच वादंग उठले होते. आता राजीव शुक्ला यांनी "भारतरत्न"चे गाजर दाखवून सचिनकडून कॉंग्रेसचा प्रचार करवून घेण्याची नीती अवलंबिली असल्याचे दिसून येते. परंतु, याला सचिन काय प्रतिक्रिया देतो यावर या कुटनीतीचे यश अवलंबून आहे.
जुन 2012 मध्ये सचिन राज्यसभेचा सदस्य झाला. क्रीडा क्षेत्रात सक्रीय असताना राज्यसभेचा सदस्य होणार तो पहिलाच खेळाडू ठरला आहे.
कॉंग्रेसने सोनिया गांधींना सुचविली होती इतर क्रिकेटपटूंची नावे, वाचा पुढील स्लाईडवर