आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sachin Tendulkar Inaugurates Mall In Vijaywada News In Marathi

PICS: सचिनच्‍या लोकप्रियतेपुढे फिके पडले अभिनेत्री अनुष्‍काचे ग्‍लॅमर

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(PVP मॉलच्‍या उद्घाटन प्रसंगी अभिनेत्री अनुष्‍का शेट्टी आणि सचिन तेंडुलकर)
विजयवाडा - माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरची लोकप्रियता अजून घटली नाही. त्‍याच्‍या चाहत्‍यांमध्‍ये उत्‍तरोत्‍तर वाढच होत आहे. याचा प्रत्‍यय एका मॉलच्‍या उद्घाटनावरुन आला आहे. तेलगु अभिनेत्री अनुष्‍का शेट्टी सोबत तो पीव्‍हीपी मॉलच्‍या उद्घाटनासाठी मॉलमध्‍ये पोहोचताच त्‍याला चाहत्‍यांचा गराडा पडला. त्‍याच्‍या या लोकप्रियतेमुळे अनुष्‍काचे ग्‍लॅमर फिके पडले.
मॉलचे प्रवर्तक पॉटलुरी वारा यांनी दोन्‍ही सेलिब्रेटींना संपूर्ण मॉल दाखविला. चाहत्‍यांना संबोधित करताना सचिन म्‍हणाला की, 'विजयवाडामध्‍ये एक क्रिकेटचा सामना खेळण्‍याची माझी इच्‍छा होती. परंतु मला तशी संधीच मिळाली नाही. आपल्‍या शहरात निर्माण झालेला हा मॉल अतिशय सुंदर असून मला आवडला आहे. आपण दर्शविलेल्‍या प्रेमाबद्दल मी आपला आभारी आहे.'

पुढील स्‍लाइडवर पाहा, सचिन आणि अनुष्‍काची छायाचित्रे..