आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करादुबई- मंगळवारी नुकत्याच जाहीर झालेल्या ताज्या आयसीसी कसोटी क्रमवारीत भारतीय संघ पाचव्या स्थानी कायम आहे. दक्षिण आफ्रिकेने न्यूझीलंडला 2-0 ने क्लीन स्वीप देत अव्वल स्थान अजून मजबूत केले. आफ्रिकेचे 124 गुण आहेत आणि सहा गुणांनी मागे असलेला इंग्लंड दुसर्या स्थानी आहे. भारताचे 105 गुण आहेत.
सचिन कसोटी फलंदाजांच्या टॉप-20 मध्ये एकमेव भारतीय खेळाडू आहे. तो 653 गुणांसह 19 व्या स्थानी आहे. ऑस्ट्रेलियाचा मायकेल क्लार्क नंबर वन व दक्षिण आफ्रिकेचा अमला दुसर्या स्थानी आहेत. गोलंदाजीमध्ये दक्षिण आफ्रिकेचा डेल स्टेन अव्वल स्थानी आहे. प्रज्ञान ओझा नवव्या, जहीर खान 15 व आर.अश्विन 20 व्या स्थानी आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.