आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sachin Tendulkar Join In National Academy For Training

तब्बल तीन महिन्यांच्या ब्रेकनंतर सचिन परतला; बंगळुरूमध्ये सराव

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बंगळुरू- न्यूझीलंडविरुद्धच्या आगामी कसोटी मालिकेसाठी सचिन तेंडुलकरने सरावास सुरुवात केली आहे. तब्बल तीन महिन्यांच्या विर्शांतीनंतर सचिन तेंडुलकर सराव करणार आहे.
सचिन बुधवारी जवळपास दीड वाजता नॅशनल क्रिकेट अकादमी (एनसीए) येथे पोहोचला. या वेळी त्याने थोडा वेळ फिजिओशी चर्चा केली. नंतर नेटवर सरावास प्रारंभ केला. सचिनने जहीर खानच्या गोलंदाजीवर कसून सराव केला. जहीर येथे गेल्या काही दिवसांपासून सराव करतोय. सचिनने वेगवान खेळपट्टीवरही सराव केला. भारत आणि न्यूझीलंडदरम्यान पहिली कसोटी 23 ऑगस्ट रोजी हैदराबादेत होणार आहे.
14 ऑगस्ट रोजी ठोकलेले पहिले शतक संस्मरणीय- 14 ऑगस्ट 1990 रोजी ठोकलेले शतक आपल्या कारकीर्दीतील संस्मरणीय क्षण असल्याचे सचिनने म्हटले. हे त्याचे पहिले कसोटी शतक होते. त्याने इंग्लंडविरुद्ध ओल्ड ट्रेफर्ड येथे 119 धावा काढल्या होत्या.