आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sachin Tendulkar Joins Mumbai Indians In Abu Dhabi News In Divya Marathi

सचिन तेंडुलकरकडून मुंबई इंडियन्सला मोलाचे मार्गदर्शन

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अबुधाबी - मागच्या वर्षी सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती स्वीकारल्यानंतर सचिन तेंडुलकर आतापर्यंत एकदाही प्रत्यक्ष मैदानावर खेळताना दिसला नव्हता. परंतु मंगळवारी अबुधाबीच्या शेख जाहेद मैदानात वेगळेच चित्र बघायला मिळाले. सचिन चक्क बॅट, पॅडसह मुंबई इंडियन्सच्या सराव सत्रात सहभागी झाला.

सचिन हा मुंबई इंडियन्स संघाचा ‘आयकॉन’ खेळाडू आहे. तो सोमवारी रात्री उशिरा अबुधाबीत पोहोचला आणि मंगळवारी सकाळीच त्याने मुंबई इंडियन्सचा संघ सराव करत असलेल्या मैदानावर धाव घेतली. या वेळी त्याने सुमारे अर्धा तासापर्यंत नेटमध्ये घाम गाळला. त्यानंतर थोडा वेळ रोहित शर्मा आणि केरॉन पोलार्डच्या सरावाकडे लक्ष दिले. दरम्यान, शर्मा आणि पोलार्डच्या खेळाविषयी त्याने मुंबई संघाचे प्रशिक्षक जॉन राइट यांच्यासोबतही चर्चा केली.

दरम्यान, सचिनच्या उपस्थितीबाबत मुंबई इंडियन्सच्या व्यवस्थापनाने म्हटले आहे की, निवृत्तीनंतर खेळाडू फक्त मौज म्हणून काही चेंडू खेळतात. परंतु सचिन मात्र मैदानात बॅट, पॅड घेऊन प्रत्यक्ष उतरला होता. हा युवा खेळाडूंसाठी एक प्रकारचा आदर्श आहे. या वेळी सचिनने आपल्या प्रतिक्रियेत म्हटले की, मी मुंबई इंडियन्ससोबत आयपीएलच्या सुरुवातीपासूनच कार्यरत आहे. आतापर्यंत मी या संघाचा प्रत्यक्ष भागीदार होतो, परंतु यंदा परिस्थिती वेगळी आहे. या वेळी मला माझा अनुभव, खेळातील बारकावे युवा खेळाडूंसोबत शेअर करायला मिळणार आहे म्हणून मी खूप उत्सुक आहे.