आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नाणेफेक जिंकून वेस्‍ट इंडीजचा प्रथम फलंदाजीचा निर्णय, रोहित शर्मा करणार पदार्पण

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कोलकाता- मास्‍टर ब्‍लास्‍टर सचिन तेंडुलकरच्‍या अंतिम कसोटी मालिकेतील पहिला सामना कोलकाताच्‍या ईडन गार्डन्‍सवर वेस्‍ट इंडीजविरोधात लवकरच सुरू होतोय. विंडीजने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्‍याचा निर्णय घेतला आहे. गेल्‍या शनिवारी ऑस्‍ट्रेलियाविरूद्धच्‍या शेवटच्‍या वनडेमध्‍ये ऐतिहासिक खेळी करणारा रोहित शर्मा आज आपली कसोटी कारकीर्द सुरू करणार आहे. सचिन त्‍याला कसोटी कॅप भेट देणार आहे.

क्रिकेटमधील महान फलंदाज सर डॉन ब्रॅडमन यांच्‍या अखेरच्‍या कसोटीनंतर अशी पहिली कसोटी असेल की ज्‍यावर भारतच नव्‍हे तर संपूर्ण जगाचे लक्ष असेल.