आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sachin Tendulkar Last Test Match In Mumbai For Mother Rajni

व्‍हीलचेअरवर बसलेल्‍या आईसाठी सचिन मुंबईमध्‍ये खेळणार अखेरची कसोटी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्‍ली- 14 नोव्‍हेंबरपासून सचिन आपली 200वी कसोटी मुंबईत खेळणार आहे. बीसीसीआयचे दौरा आणि कार्यक्रम निर्धारण समितीचे प्रमूख राजीव शुक्‍ला यांनी याची माहिती दिली. सचिननेच आपली 200वी कसोटी मुंबईत व्‍हावी असा आग्रह धरला होता. मंडळाने त्‍याची मागणी मान्‍य केली असल्‍याचे त्‍यांनी सांगितले.

बीसीसीआयने सचिनच्‍या 200व्‍या कसोटीसाठी वेस्‍ट इंडीजला मायदेशात मालिका खेळण्‍यासाठी निमंत्रण दिले होते. यासाठी मंडळाला दक्षिण आफ्रिकेच्‍या दौ-यात कपात करावी लागली. सूत्रांकडून मिळालेल्‍या माहितीनुसार सचिनची 199वी कसोटी कोलकाता आणि दुसरी 200वी कसोटी मुंबईच्‍या वानखेडेवर होणार आहे.

माध्‍यमांमध्‍ये आलेल्‍या वृत्तानुसार सचिनने हा निर्णय आपल्‍या आईसाठी घेतला आहे. सचिनची आई रजनी यांनी आतापर्यंत आपल्‍या मुलाचा एकही आंतरराष्‍ट्रीय सामना स्‍टेडिअममध्‍ये पाहिलेला नाही. आपल्‍या आयुष्‍यातील सर्वात भावूक क्षणी आई स्‍टेडिअममध्‍ये असावी असे सचिनला वाटते. पुढच्‍या स्‍लाईडला क्लिक करून पाहा सचिनची आई रजनी यांना...