आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जेव्हा सचिन रागाच्या भरात गांगुलीला म्हणाला, 'सुधारणा कर नाही तर घरी पाठवून देईल'

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - निवृत्तीनंतर क्रिकेटर त्यांच्या अनुभवांसोबतच अनेक पडद्याआडचे किस्से सांगून चहात्यांमध्ये खळबळ उडवून देत आहेत. असाच एक खुलासा भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार सौरव गांगुलेने सचिन तेंडुलकरबद्दल केला आहे. 1997 मध्ये भारतीय संघ सचिनच्या नेतृत्वात कॅरिबियन दौ-यावर होता. यावेळी कर्णधार सचिन तेंडुलकर खेळाडूंवर अतिशय नाराज होता. गागुंलीला तर सचिनने अर्ध्यातूनच परत पाठवण्याची धमकी दिली होती.
ही घटना बार्बाडोसच्या तिस-या कसोटी दरम्यान घडली होती. येथील सामन्यात वेस्ट इंडिजने भारतावर 38 धावांनी मात केली होती. वेस्ट इंडिजच्या 120 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना अवघड खेळपट्टीवर भारतीय संघ केवळ 81 धावांत गारद झाला होता. गांगुलीने हा खुलासा 'माय फॉल्ट अ‍ॅक्च्युली' या लेखात केला आहे. तो लिहितो, 'संघाच्या या निराशाजनक खेळामुळे सचिन खेळाडूंवर नाराज होता. त्याचा मुड बदलण्यासाठी मी त्याला विचारले, मी आता काय करु. त्यावर सचिनचे उत्तर होते, उद्या सकाळी तु मैदानाला चक्कर मारायच्या.'
'त्याची धमकीने माझ्यात जोश निर्माण झाला'
गांगुली लिहितो, 'आता हे सांगण्याची वेळ आली आहे. जेव्हा सचिनला कळाले की, मी सकाळी मैदानाला चक्कर मारली नाही तेव्हा तो रागाने लालेलाल झाला होता. त्याने मला काय-काय सुनावले हे येथे शब्दात मांडता येणार नाही. त्याने मला, अर्धवट दौ-यातूनच घर परत पाठवले जाईल. जर माझे वर्तन सुधारले नाही तर करियर संपूष्टात येईल असे सुनावले. घरी परत पाठवण्याची धमकी माझ्यात जोश निर्माण करण्यास पुरेशी होती. मी एकही विक्रम करु शकलो नसतो, मात्र दुस-या दिवशी सकाळपासून मी कठीण परिश्रम करु लागलो.'

पुढील स्लाइडमध्ये, सचिन आत्मकथा लिहिणार..