(फोटो - सारा आणि सचिन तेंडुलकर)
कोलकाता - मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा केल्यानंतर कुटुंबाला वेळ देणार असे बोलला होता. मात्र सचिन कुटुंबाला वेळ देण्यात असमर्थ ठरला आहे. त्याची सर्वांत लाडकी लेक साराच्या हिच्या 17 व्या वाढदिवसाला तो हजर राहू शकला नाही.
रविवारी सचिनच्या मुलीचा 17 वा वाढदिवस होता. मात्र सचिन रविवारी संपर्ण दिवस कोलकाता येथील सॉल्ट लेक स्टेडियममध्ये सुरु असलेल्या इंडियन सुपर लीग मध्ये उपस्थित होता. ओपनिंग सेरेमनी नंतर त्याने सामन्याचा आनंदही लुटला. या व्यस्ततेत तो मुलीच्या वाढदिवसाला उपस्थित राहू शकला नाही.
आणि सचिनचे अभिवचन तुटले...
गेल्या वर्षी सचिनने नोव्हेंबर महिन्यात निवृत्ती स्विकारल्यानंतर त्याने म्हटले होते की, ''सोळी वर्ष मी मुलांना, कुटुंबियांना वेळ देवु शकलो नाही. परंतु पुढील 16 वर्ष मी कुटूंबिंयांसोबत राहणार आहे. '' परंतु तो वचनाला जागू शकला नाही.
पुढील स्लाइडवर पाहा, कोठे व्यस्त राहतो सचिन...