आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निवृत्तीनंतरही सचिनच असेल मुंबई इंडियन्सचा ‘आयकॉन’

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - सचिन तेंडुलकरने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती स्वीकारली असेलही, मात्र तो मुंबई इंडियन्सचा अजूनही प्रेरणास्थान आहे. फलंदाज म्हणून नाही तर संघाचा प्रेरणास्रोत, प्रेरकशक्ती म्हणून मुंबई इंडियन्सने आज सचिन तेंडुलकरच्या नावाची ‘आयकॉन’ म्हणून घोषणा केली.
‘आयपीएल स्पर्धेच्या प्रारंभापासून तो मुंबई इंडियन्स संघाची प्रेरकशक्ती होता. गत हंगामात आम्ही विजेतेपद पटकावून सचिनला हृद्य निरोप दिला. मुंबई इंडियन्सचा आयकॉन (प्रेरणास्थान) म्हणून त्याची निवड करताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे, संघातील तरुण, नवोदित खेळाडूंना सचिन त्यांच्या आजूबाजूला, अनुभवाचा ठेवा घेऊन असणे हे आल्हाददायक वाटेल, तसेच मुंबई इंडियन्सच्या चाहत्यांसाठीही ती गोष्ट आनंददायी असेल, अशी प्रतिक्रिया मुंबई इंडियन्सच्या मालक नीता अंबानी यांनी दिली आहे.’
पुढील स्लाइडमध्ये, शाहरुख, माधुरी, दीपिका थिरकणार