आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

sachin special: कारचा शौकिन, घड्याळे जमवण्याचा छंद तर मसूरी आवडते ठिकाण

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भारताने २०११ साली मुंबईत विश्वचषक जिंकला तो क्षण आयुष्यतील सर्वोच्च क्षण असल्याचे सचिन मानतो. - Divya Marathi
भारताने २०११ साली मुंबईत विश्वचषक जिंकला तो क्षण आयुष्यतील सर्वोच्च क्षण असल्याचे सचिन मानतो.
स्पोर्ट्स डेस्क- माजी क्रिकेटपटू सचिन तेंडूलकर सोमवारी 44 वर्षांचा (24 एप्रिल, 1973) झाला. क्रिकेटमधून निवृत्त घेऊन त्याला अडीच वर्षे झाली. पण आजही तो पूर्वीप्रमाणे सक्रिय आयुष्य जगत आहे. वयाच्या अवघ्‍या 22 व्या वर्षी कोट्यावधी रुपयांचा करार करणारा सचिन निवृत्तीनंतरही करोडपती आहे. 20 वर्षांपूर्वी झाला होता सर्वात श्रीमंत क्रिकेटपटू...
 
- 1995 मध्‍ये सचिनने वर्ल्ड टेलबरोबर 31.5 कोटींच्या पाच वर्षांच्या करारावर स्वाक्षरी केली होती. 
- याबरोबरच तेव्हा तो सर्वात श्रीमंत क्रिकेटपटू बनला होता. 20 वर्षांपूर्वी कोणत्यातरी ब्रँडसाठी कोट्यावधी रक्कम मिळणे खूप मोठी गोष्‍ट होती. 
- 16 व्या वर्षी आंतरराष्‍ट्रीय क्रिकेटमध्‍ये एण्‍ट्री करणारा सचिन आज कोट्यावधींचा मालक आहे. 
- फोर्ब्स मासिकानुसार सध्‍या त्याची एकूण संपत्ती 115 मिलियन यूएस डॉलरच्या घरात म्हणजे 800 कोटी रुपयेहून अधिक आहे.
 
प्रसिध्‍द ब्रँड्सची जहिरात करीत आहे-
 
- सचिन भले क्रिकेटपासून दूर झाला असेल. मात्र जहिरातींबाबत तो आजही अनेक कंपन्यांचा पहिला चॉइस आहे. 
- तो ल्युमिनस, मुसाफीर डॉट कॉम, कोका कोला, अदिदास, अवीवा, तोशिबा, स्विस वॉच, फिएट, व्हिसा, ऑडेमार्स पिगुएट घड्याळे, कॅस्ट्रॉलसह सर्व ब्रँड्सच्या जहिराती करत आहे. 
- एका क्रीडा वृत्तानुसार, 2014 मध्‍ये सचिनला जहिरातीमधून 75 कोटी रुपयांची कमाई केली होती. 
- नोव्हेंबर 2013 मध्‍ये सचिनने क्रिकेटमधून निवृत्तीनंतर जहिराती मिळण्‍यास घट झाली होती. मात्र आता तो जहिरात विश्‍वाचा राजा बनला आहे.
 
पुढील स्लाईड्सवर जाणून घ्‍या, सचिनचे कार कलेक्शन, 80 कोटींचे घर आणि त्याच्या छंदांविषयी...
बातम्या आणखी आहेत...