आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sachin Tendulkar News In Marathi, Cricket, Divya Marathi

सचिनच्या केरलाकडून मायकल चोप्रा खेळणार

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - मूळ भारतीय वंशाचा असलेला ब्रिटिश फुटबॉलपटू मायकल चोप्रा याला सचिनच्या केरला ब्लास्टर्सने खरेदी करत संघात अंतर्भूत केले आहे. चोप्राला ५८ हजार १८५ डॉलर्सना खरेदी करण्यात आले आहे. सचिन सहमालक असलेल्या फुटबॉल क्लबशी जोडले जाण्याने खूप आनंद वाटल्याचे इंग्लंडमध्येच जन्मलेल्या चोप्राने ट्विट केले आहे.
पूर्वी न्यूकॅसल युनायटेड आणि त्यानंतर ब्लॅकपूल क्लबचा सदस्य म्हणून मायकल चोप्राने योगदान दिलेले आहे. केरला ब्लास्टर्सचा प्रमुख खेळाडू असलेल्या डेव्हिड जेम्सने चोप्राच्या नविडीचे स्वागत केले आहे. जेम्स हा लवि्हरपूल आणि मँचेस्टर सिटीसारख्या अव्वल फुटबाॅल संघांकडून खेळलेला असून त्याला दगि्गजांसमवेत खेळण्याचा अनुभव आहे. चोप्रा आमच्या संघाकडून खेळण्यास खूप उत्सुक असून त्याच्या नविडीने संघ अधिक समतोल होणार असल्याचे या वेळी जेम्स यांनी सांगितले.

बंगळुरूऐवजी चेन्नईचा संघ
आयएसएलमध्ये खेळणा-या संघांमध्ये आठवा संघ आता बंगळुरूऐवजी चेन्नईचा राहणार आहे. सन ग्रुपच्या बंगळुरूने माघार घेतल्यानंतर चेन्नईच्या संघाला ही संधी देण्यात आली आहे. चेन्नई फ्रँचायझीच्या मालकांची घोषणा नंतर करण्यात येणार असल्याचे आयएसएलचे सीईओ अनुपम दत्ता यांनी सांगितले. सन ग्रुप, आयएमजी रिलायन्स आणि स्टार इंडियाने प्रदीर्घ चर्चेनंतर संघ माघारीचा निर्णय घेत असल्याचे कळवले असल्याचेही दत्ता यांनी नमूद केले.