आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sachin Tendulkar News In Marathi, Indian Cricket, Wankhede Stadium

मनोगतात कुणा एकाचेही नाव विसरायचे नव्हते - सचिन तेंडूलकर

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - घेऊ कसा निरोप, तुटतात आत धागे.. विक्रमादित्य सचिन तेंडुलकरने मुंबईत वानखेडे मैदानावर व्यक्त केलेल्या ओथंबलेल्या भावना क्रिकेट रसिक विसरू शकणार नाहीत. सचिनची अवस्था अगदी या गाण्यासारखीच झाली होती. त्याच्याबरोबर प्रत्येक क्रिकेटप्रेमी दु:खी झाला होता. कित्येकांचे डोळे अश्रूंनी डबडबले होते. मास्टर ब्लास्टरने प्रत्येकाचे, अगदी प्रत्येकाचे न विसरता नाव घेतले. कोणाचेही नाव विसरायचे नाही, अशी खूणगाठच त्याने बांधली होती. त्यासाठी विमानात खास तयारीही केली होती. मुंबईत एका कार्यक्रमात बोलताना सचिनने याविषयी प्रथमच मन उलगडले.


तो म्हणाला, आम्ही विमानाने कोलकात्याहून मुंबईकडे कूच केले. आपण शेवटची कसोटी खेळणार आहोत, असा विचार त्या वेळी मनात डोकावला. मी एकटाच बसून विचार करू लागलो. सामन्यानंतर निरोपाचे मनोगत व्यक्त करावे लागेल. जगच माझे मनोगत ऐकायला आतुर होते. त्यामुळे जी नावे मला घ्यायची होती, त्यातून एकही विसरून राहू नये, असे मनोमन ठरवले. सचिन पुढे म्हणाला, माझ्यासाठी तो खास क्षण होता. मी अगदी मनापासून सगळ्यांची नावे घेतली. मला माहीत आहे, मी तेव्हा खूपच भावनावश झालो होतो. अश्रू लपवायला मलाही कारण शोधावे लागले.


सर्व प्रकारच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केल्यानंतर चाहत्यांच्या भावना उचंबळून येत होत्या. मी यापूर्वी हे कुठेच पाहिले नाही. चाहत्यांच्या अपार प्रेमाने भारावून गेलो. त्यामुळे निरोपाचे भाषण म्हणजे अगदी मनाच्या गाभार्‍यातून उमटलेल्या भावना होत्या, अशा शब्दांत हळव्या सचिनने मन मोकळे केले.