आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सचिन: यापुढे जल्लोषाची संधी नाही...

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
साधारणपणे 23-24 वर्षांपूर्वी सचिन रमेश तेंडुलकर नावाचा एक तारा क्रिकेटचा आकाशात तळपताना दिसू लागला व लवकरच त्याने सर्वांना वेडच लावलं. अगोदरच आमचं क्रिकेटवर अतोनात प्रेम, त्यात सचिन नावाचं वादळ. मग तहानभूक विसरून लोक सचिनचा खेळ पाहू लागले. सचिन स्वत: त्याचा गेम एन्जॉय करीत होता. त्याचबरोबर त्याने लोकांना भरभरून आनंद दिला. माझ्यासारखे अनेक होते की ज्यांना केवळ सचिनचा खेळ पाहण्यातच जास्त रस असायचा. इतका प्रदीर्घ काळ खेळत राहून त्याने लोकांना आनंद तर दिलाच, पण अनेक विक्रमही केले. सचिनची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून होणारी निवृत्ती ही एका सर्वसामान्य खेळाविषयीची निवृत्ती नाही तर ती एका असामान्य अतुलनीय खेळाडूची एक्झिट आहे. व्यावसायिक म्हणून आम्हाला तसा मोकळा वेळ फार कमी मिळतो. क्रिकेट पाहायला मला आवडतं, पण तेवढा वेळ नेहमी नसतो. अशा वेळी मी केवळ सचिनचा खेळ पाहतो. शारजामधील एक मॅच मला आठवते. तेव्हा मी बाहेरगावी होतो. मी सचिनची फलंदाजी टीव्हीवर पाहिलीय. अतिशय अप्रतिम खेळणारा सचिन आता निवृत्त होतोय. वेळेचं बंधन असलेल्या माझ्यासारख्यांची मात्र फारच पंचाईत होणार आहे. जीवनातल्या एका मोठ्या आनंदाला मी आता मुकणार आहे.
शब्दांकन: संतोष काळे