आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुलांसाठी झटणा-या देशातील सर्व मातांना \'भारतरत्‍न\' समर्पित- सचिन तेंडुलकर

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- मला मिळालेला भारतरत्‍न पुरस्‍कार हा देशातील सर्व माता ज्‍या आपल्‍या मुलांच्‍या प्रगतीसाठी झटतात त्‍यांना मी समर्पित करतो, असे भावपूर्ण उद्गार भारतरत्‍न पुरस्‍कार प्राप्‍त सचिन तेंडुलकरने काढले. भारतरत्‍न पुरस्‍कार मिळाल्‍यानंतर पहिल्‍यांदाच पत्रकार परिषदेला सामोरे आलेल्‍या सचिनने पत्रकारांच्‍या वेगवेगळया प्रश्‍नांना उत्तरे दिली.

गेल्‍या 24 वर्षांपासून देशासाठी क्रिकेट खेळणे माझ्यासाठी खूप महत्‍वाची गोष्‍ट राहिली आहे. मी आयुष्‍यातील 75 टक्‍के क्रिकेटसाठी दिले आहेत. निवृत्त होण्‍याची हीच योग्‍य वेळ होती. शारीरिक मर्यादाही आल्‍या होत्‍या. आतून आवाजही आला की हीच योग्‍य वेळ आहे, त्‍यामुळे मी निवृत्ती जाहीर केली.


मी टीमचा हिस्‍सा असेल नसेल पण ह्दयात कायम भारत असेल, असे सचिनने म्‍हटले. मला मिळालेला भारतरत्‍न पुरस्‍कार माझ्या आईबरोबर सर्व मातांना अर्पित करतो ज्‍यांनी आपल्‍या मुलांसाठी त्‍याग केला. मला वाटते भारताने प्रत्‍येक खेळात विजय मिळवला पाहिजे. निवृत्त झालो असलो तरी क्रिकेटशी कोणत्‍या कोणत्‍या प्रकारे मी जोडलेलाच असेल, कशा पद्धतीने याचा अद्याप विचार केलेला नाही. परंतु, युवा पिढीला मार्गदर्शन करणे मला आवडेल

आचरेकरसर आणि भाऊ अजितच्‍या मार्गदर्शनामुळेच मी इथंपर्यंत पोचू शकलो. प्रत्‍येकवेळी आम्‍ही चर्चा करीत असत. अजित आणि माझं नातंच वेगळं होतं. ते शब्‍दांत सांगणं कठीण आहे. मी बाद झाल्‍यानंतर तो माझ्याशी चर्चा करायचा. इतकंच काय मी 74 धावांवर बाद झाल्‍यानंतरही तो आणि मी रात्री याविषयावर चर्चा केली.

आचरेकरसरांनी मला कधी वेलप्‍लेड म्‍हटलं नव्‍हतं. मी ज्‍या-ज्‍यावेळी धावा करायचो, तेव्‍हा सर वेलप्‍लेड म्‍हणतील अशी आशा असायची. पण सर कधीच असे म्‍हणायचे नाही. कारण त्‍यामुळे खेळाडू वाहवत जाईल असे वाटायचे. त्‍यामुळे मी त्‍यांना काल सामन्‍यानंतर गमतीने सरांना वेलप्‍लेड म्‍हणावयास काही हरकत नाही असे म्‍हणालो होतो. पण काल जेव्‍हा भारतरत्‍न अवॉर्ड घोषित झाला. तेव्‍हा त्‍यांनी फोन करून वेलडन म्‍हटलं. तो माझ्यासाठी खरोखरच आनंदाचा क्षण होता, असे सचिन म्‍हणाला. अर्जुनबाबतीत काय म्‍हणाला सचिन, वाचा पुढच्‍या स्‍लाईडला...