आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सभ्‍य आणि सोज्‍वळ सचिन होता फारच खोडकर, आई घ्‍यायची अशी काळजी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबईचे वानखेडे स्‍टेडिअम 16 नोव्‍हेंबर रोजी भारतीय क्रिकेट इतिहासातील एका ऐतिहासिक क्षणांचा साक्षीदार ठरले. वेस्‍ट इंडीजविरूद्धच्‍या दुस-या कसोटीच्‍या तिस-या दिवशी टीम इंडियाच्‍या विजयाबरोबरच सचिन तेंडुलकरने 24 वर्षांच्‍या क्रिकेटमधील सोनेरी करिअरला अलविदा केले.

आपण जितके मोठे क्रिकेटपटू आहे. त्‍यापेक्षाही व्‍यक्‍ती म्‍हणून श्रेष्‍ठ असल्‍याचे सचिनने पुन्‍हा सिद्ध केले. सचिनने आपल्‍या आयुष्‍यातील क्रिकेट करिअरच्‍या सुरूवातीपासून ते निवृत्तीपर्यंतच्‍या संस्‍मरणीय आठवणी शब्‍दबद्ध केल्‍या. क्रिकेटच्‍या या देवाने आपल्‍या मनोगतात आयुष्‍यात आलेल्‍या प्रत्‍येक व्‍यक्‍तीचे आभार मानले.

सचिनने या क्षणी आई रजनी तेंडुलकर यांच्‍या योगदानाची आठवण करून देताना लहानपणातील आपल्‍या खोडकर स्‍वभावाच्‍या आठवणी सांगितल्‍या. माझ्यासारख्‍या खोडकर मुलाला सांभाळणे सोपे नव्‍हते. परंतु, माझ्या आईने ही जबाबदारी योग्‍यरित्‍या निभावली.

24 वर्षांच्‍या करिअरमध्‍ये सभ्‍यता, साधेपणाची प्रेरणा राहिलेला सचिन एकेकाळी खूप हट्टी आणि खोडकर होता. यावर त्‍याच्‍या चाहत्‍यांचा विश्‍वास बसणे कठीण जाईल. पुढच्‍या स्‍लाईडला क्लिक करून पाहा सभ्‍य आणि सोज्‍वळ सचिनच्‍या लहानपणीचा खोडकर अंदाज...