आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

क्रिकेट रुसले, सचिन तेंडुलकरचा अखेर अलविदा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जसे नाव, तसे क्रिकेटच्या विश्वात सचिनचे रूप आहे. शुद्ध व सत्य असा सचिन या नावाचा अर्थ होतो. नावाप्रमाणे या विश्वात कामगिरी करत असल्यामुळे त्याला क्रिकेटचा देव म्हटले जाऊ लागले.

साहित्यिक रमेश तेंडुलकर व रजनी यांच्या घरात 24 एप्रिल 1973 रोजी या महान बालकाने जन्म घेतला. त्या वेळी कोणी विचारही केला नसेल की हा मुलगा क्रिकेटच्या विश्वात आपले विराट रूप सर्वांना दाखवेल. क्रिकेटच्या या ‘देवा’ने दोन दशकांत विविध विक्रमांना गवसणी घातली. यामध्ये वनडेमधील द्विशतक असो की शतकांचे महाशतक असो, अशा विक्रमी खेळीच्या बळावर सचिनने धावांचा हिमालय उभा केला. ज्याची उंची कोणीही कमी करू शकणार नाही.

चार वर्षांचा असताना सचिनने हातात बॅट घेतली होती. बॅट तोलण्याचे वय नसले तरी त्याच्यात महान फलंदाज होण्याची परिपक्वता होती. त्याने काही दिवसांत ही खेळी आत्मसात केली. वेगवान गोलंदाज होण्याची त्याची इच्छा होती. मात्र प्रशिक्षक रमाकांत आचरेकर यांनी त्याच्यातील प्रतिभा ओळखली आणि त्यातूनच सचिनच्या इच्छेला कलाटणी मिळाली. आचरेकरांच्या मार्गदर्शनाखाली त्याने फलंदाजीचे धडे गिरवणे सुरू केले होते. चपळ व विश्वासू असलेल्या शिष्यावर गुरू आचरेकरांचा प्रगल्भ विश्वास होता. यामुळे ते त्रिफळ्यावर एक रुपया ठेवत होते. सचिनला त्रिफळाचीत करून तो रुपयाचा शिक्का घेऊन जाण्यास ते सर्व गोलंदाजांना सांगत होते. मात्र सर्व गोलंदाज यामध्ये अपयशी ठरत होते. अखेर तो रुपयाचा शिक्का सचिनला मिळत होता. आचरेकरांच्या या वेगळ्या मार्गदर्शनामुळे सचिनमधील फलंदाजी पूर्णपणे यशस्वी झाली होती. विद्यार्थिदशेत सचिनमधील फलंदाजी अधिक बहरली होती. त्याला चांगल्या खेळीची लय गवसली होती. यातून विक्रमांचा पल्ला गाठण्याची नवी उमेद त्याच्यात निर्माण झाली होती. मैदानावर उतरल्यावर विक्रमी धावांचा पाऊस पाडणारी फलंदाजी तो करू लागला. 1987 मध्ये मुंबई येथे विश्वचषकाचा सामना खेळवला गेला होता. या वेळी सचिन चौदा वर्षांचा होता. बाँड्री बॉयच्या भूमिकेत तो या वेळी मैदानावर होता. या सामन्यातून घेतलेल्या प्रेरणेतून आजच्या घडीला सचिनने कारकिर्दीतले सहा विश्वचषकातील सामने खेळले आहेत. तसेच त्याने अपूर्व व अशक्य असा शतकांचे शतक ठोकण्याचा विक्रम केला आहे, जो आजच्या घडीला तोडणे अशक्यप्राय आहे. मात्र ही कामगिरी त्याने करून दाखवली. 21 वर्षांपासून तो क्रिकेट खेळत आहे. यामुळे तो क्रिकेट खेळाशी एकरूप झाला आहे. क्रिकेट हेच त्याचे जीवन झाले आहे. त्यामुळे या जीवनाचा पुरेपूर आनंद घेण्यासाठी तो जोमाने खेळताना दिसतो. त्याच्या चेहर्‍यावर नेहमीच हास्य असते. जीवनाचा आनंद घेण्याची ही शैेली त्याला यशाचा पल्ला गाठण्यासाठी प्रोत्साहन देते. आजच्या घडीलादेखील नवतरुण खेळाडूंसारखे क्षेत्ररक्षण करताना सचिन दिसून येतो. कमी उंचीमुळे त्याला काही वेळा निराशेलाही सामोरे जावे लागत होते. मात्र त्याने याकडे दुर्लक्ष करत यश व कीर्तीची मोठी उंची गाठली आहे.

बॅट जरी धावांच्या शिखरावर पोहोचलेली असली तरी सचिनचे पाय मात्र जमिनीवरच आहेत. सचिन नेहमीच देवाला धन्यवाद देत असतो. त्याची देवावर निष्ठा आहे. माझ्यासाठी धावा काढणे, शतक ठोकणे हेच काही सर्व नाही. माझ्या मित्र व नातेवाइकांचा गोतावळा माझ्यासाठी महत्त्वाचा असल्याचे सचिनने एकदा मुलाखतीत म्हटले होते.

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचे विक्रम वाचण्यासाठी पुढील स्लाईडला क्लिक करा...