आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मास्टर ब्लास्टरने पोस्ट केला बालमित्र विनोद कांबळीसोबतचा PHOTO

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फोटो: सचिन तेंडुलकरसोबत विनोद कांबळी (सचिनने पोस्ट केलाला फोटो)
मुंबई- मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने 'इंस्टाग्राफ'वर त्याचा एकेकाळचा जीवलग मित्र विनोद कांबळीचे छायाचित्र पोस्ट केले आहे. यावरून दोघांमधील बिघडलेले संबंध पूर्ववत होत असल्याचे संकेत मिळत आहेत. काही वर्षांपूर्वी सचिन तेंडुलकर आणि विनोद कांबळीच्या यांच्या मैत्रीत फूट पडली होती.
सचिनने गुरुवारी सायंकाळी हे छायाचित्र पोस्ट करून 'डाऊन टू मेमोरी लेन', असे कॅप्शनही लिहिले आहे. सचिन आणि विनोदचे छायाचित्र 'इंस्टाग्राम'वर झळकताच त्याला हजारों लाइक्स मिळाल्या. सचिनच्या खांद्यावर हात टाकून कांबळी उभा असल्याचे छायाचित्रात दिसत आहे. दरम्यान, सचिनने प्रदीर्घ काळानंतर बालमित्र कांबळीचा सार्वजनिक स्तरावर उल्लेख केला होता.

कांबळीने केले होते सचिनवर आरोप...
विनोद कांबळीने 2000 मध्ये सचिन तेंडुलकरवर घणाघाती आरोप केले होते. आपल्या पडतीच्या काळात सचिनने साथ सोडल्याचे कांबळीने म्हटले होते. सचिन नेहमी 'सेफ गेम' खेळतो. मित्रांना जेव्हा त्याची गरज असते, तेव्हा तो त्यांच्याकडे दूर जातो. तसेच सचिनने नोव्हेंबर 2013 मध्ये दिलेल्या निरोप समारंभातील भाषणात आपल्या नावाचा हेतु पुरस्तर उल्लेख टाळल्याचेही कांबळीने म्हटले होते.

विनोद आणि माझी लाइफस्टाइल वेगळी- सचिन
विनोद कांबळ‍ी आणि माझ्या लाइफस्टाइल वेगळी असल्याचे सचिन तेंडुलकर एका प्रश्नाला उत्तर देताना सांगितले होते. कांबळीच्या प्रतिभेबद्दल बोलणार नाही. कारण, प्रतिभेचे मोजमाप करणे माझे काम नाही, असेही सचिन म्हणाला होता. विशेष म्हणजे आमचे स्वभाव वेगळे असल्याचे सचिनने स्पष्ट केले.

सचिन-कांबळीची मैत्री
सचिन आणि विनोद कांबळीने शाळेत असताना 24 फेब्रुवारी, 1988 रोजी हॅरिस शील्ड इंटर स्कूल क्रिकेट टूर्नामेंटमध्ये सेंट जेव्हियर्स (फोर्ट) विरुद्ध शारदाश्रम विद्यामंदिर दरम्यान झालेल्या सामन्या 664 धावांची रेकॉर्डब्रेक भागिदारी केली होती. दोघांनी टीम इंडियासाठी देखील अनेक वर्षे क्रिकेट खेळली. 1993 मध्ये इंग्लंड आणि झिम्बॉंबेविरुद्ध सलग द्विशतक ठोकून कांबळीने सगळ्यांना आश्चर्याचा धक्का दिला होता. कांबळीने 1991 ते 2000 दरम्यान 17 कसोटी आणि 104 वन-डे सामने खेळला.

पुढील स्लाइडवर क्लिक करून पाहा, सचिन तेंडुलकर आणि विनोद कांबळीचे बालपणाचे निवडक फोटो...