मुंबई - आगामी विश्वचषक भारतीय संघच पटाकावेल अशी ग्वाही निवृत्तीनंतर पहिल्यादा भारतरत्न सचिन तेंडुलकर याने दिली आहे. उल्लेखनिय म्हणजे भारताने इंग्लंडमध्ये कसोटी मालिकेच्या पराभवाचा बदला घेताना एकदिवसीय मालिकाविजय मिळविला आहे. त्यावरुन सचिनने असे वक्तव्य केले आहे.
क्षेत्ररक्षणात सुधारणा
क्रिकेटचा देव मानल्या जाणा-या सचिनने म्हटले की, 'भारतीय संघच आगामी विश्वचषकाचा प्रबळ दावेदार आहे. भारतीय संघ अतिशय संतुलित असून भारताला पराभूत करने सोपे नाही. भारताची गोलंदाजी सुधारी असून त्याहीपेक्षा क्षेत्ररक्षणात मौलिक सुधारणा झाली आहे;
गोलंदाजी आणि फलंदाजीचे योग्य मिश्रण
सचिन म्हणाला की, 'भारतीय संघामध्ये डाव्या आणि उजव्या हाताने खेळणा-या खेळाडूंचा अतिशय चांगला समन्वय आहे.' त्यामुळे मैदानावर प्रतिस्पर्धी संघाची क्षेत्ररक्षण सजवताना दैना उडते. भारतीय संघ सध्या जोरदार कामगिरी करत असून भारताची क्षमता मी ओळखून आहे.