Home | Sports | From The Field | sachin tendulkar says he feels more free on england roads

सचिन मुंबईत घराबाहेर पडतो नकली दाढी किंवा टोपी घालून

Agency | Update - Jun 03, 2011, 08:21 PM IST

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने भारतात फिरताना मला नकली दाढी घालून किंवा वेगवेगळ्या टोप्या घालून फिरावे लागत असल्याचा खुलासा केला आहे.

  • sachin tendulkar says he feels more free on england roads

    sachin_250_03लंडन - मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने भारतात फिरताना मला नकली दाढी घालून किंवा वेगवेगळ्या टोप्या घालून फिरावे लागत असल्याचा खुलासा केला आहे.

    सचिन तेंडुलकरने वेस्टइंडीज दौऱ्यावर न जाता आराम घेण्याचा निर्णय घेतला. सचिनच्या या निर्णयामागे प्रमुख कारण म्हणजे लंडनमध्ये आराम करण्याचे आहे. सचिन भारताच्या इंग्लंड दौऱ्याचा प्रतीक्षा करीत आहे. सचिनने लॉर्डस मैदानाच्या बाजूलाच घर घेतले असून, तेथे तो आरामासाठी गेला आहे. त्याठिकाणी तो रस्त्यांवर व्यवस्थित फिरू शकतो.

    सचिन म्हणाला, मी लंडनप्रमाणे भारतात खुलेआम फिरू शकत नाही. मी घराबाहेर पडल्यावर प्रशंसक लगेच मला घेराव घालतात. मुंबईत तर मला घराबाहेर पडताना नकली दाढी किंवा वेगवेगळ्या टोप्या घालाव्या लागतात. कधी-कधी तर मी अर्ध्या रात्री कार घेऊन घराबाहेर पडतो.Trending