आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sachin Tendulkar Says Sharapovas Remarks Was Not Outrageous

शारापोव्हा क्रिकेट पाहात नाही, त्यामुळे तिला मी माहित नाही - सचिन

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली: मारिया शारापोव्हाचा 'मला माहित नाही सचिन तेंडूलकर कोण आहे ' या वक्तव्याने संपूर्ण देशात वादळ उठले होते, मात्र खुद्द सचिनलाच या वक्तव्यात काहीच अपमानजनक वाटत नसल्याचे दिसते आहे.
सचिनने दिलेल्या एका मुलाखतीत तो म्हणाला की, "मारिया शारापोवा ही एक उत्तम टेनिसपटू आहे. कदाचित ती क्रिकेट पाहात नाही. त्यामुळे ती मला ओळखत नाही. तिच्या वक्तव्याने माझा कोणताच अपमान झालेला नाही. " सचिनच्या या शांत प्रतिक्रियेमुळे त्याच्या चाहत्यांना नक्कीच काहीतरी शिकायला मिळेल. तसेच यातून सचिनच्या संयमी स्वभावाची पुन्हा एकदा प्रचिती आली आहे.

मारियाच्या या वक्तव्यानंतर सचिनसमर्थकांनी सोशल नेटवर्कींगवर अत्यंत भडक प्रतिक्रिया दिल्या होत्या. विंबलडनच्या एका सामन्यादरम्यान एका पत्रकार परिषदेत सचिन कोण आहे, मी त्याला ओळखत नाही असे शारापोव्हा म्हणाली होती.

शारापोव्हाच्या वक्तव्यानंतर सोशल नेटवर्कींगवर सचिन चाहत्यांकडून देण्यात आलेल्या प्रतिक्रीया...