आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sachin Tendulkar Selection India Vs Australia Triangular Series

तिरंगी मालिकेसाठी सचिनचा वनडे संघात समावेश; इरफान, झहीरला संधी

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

चेन्नई: ऑस्ट्रेलियात होणार्‍या एकदिवसीय सामन्यांच्या तिरंगी मालिकेसाठी अनुभवी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरचा टीम इंडियात समावेश करण्यात आला आहे. भारतात झालेल्या विश्वचषकानंतर सचिन प्रथमच वनडेत खेळेल हे विशेष. रविवारी जाहीर झालेल्या भारतीय संघात सचिनसह वेगवान गोलंदाज जहीर खान, प्रवीणकुमार, फिरकीपटू राहुल शर्मा, अष्टपैलू खेळाडू इरफान पठाण यांचीही 17 सदस्यीय संघात निवड करण्यात आली आहे. ऑफस्पिनर हरभजन सिंगला या वेळीही संघात स्थान मिळू शकले नाही.
के. र्शीकांत यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या निवड समितीच्या मॅरेथॉन बैठकीनंतर बीसीसीआयचे सचिव संजय जगदाळे यांनी भारतीय संघाची घोषणा केली. ऑस्ट्रेलियाकडून कसोटीत 3-0 ने सपाटून मार खाल्ल्यानंतरही वनडे संघात चमत्कारिक बदल झालेला नाही.
सचिनने आपला अखेरचा वनडे सामना 2 एप्रिल रोजी विश्वचषक फायनलच्या रूपाने खेळला होता. वनडेत पुनरागमन केल्यामुळे ऑस्ट्रेलिया दौर्‍यातच ऐतिहासिक शंभरावे शतक ठोकण्याची संधी सचिनकडे असेल.
युवराज सिंग अद्याप ट्यूमरच्या आजारातून तंदुरुस्त होत असून हरभजन सिंगच्या नावाचा मात्र या वेळी विचार झाला नाही. मुनाफ पटेल, वरुण एरोन यांनाही संधी मिळाली नाही.
पाच वेगवान गोलंदाजांचा समावेश
अनुभवी जहीर खानसह या वेळी पाच वेगवान गोलंदाजांचा संघात समावेश करण्यात आला. जहीरच्या जोडीला डावखुरा युवा गोलंदाज इरफान पठाण, प्रवीणकुमार, उमेश यादव आणि विनयकुमार असतील. फिरकीची मदार आर. अश्विन, रवींद्र जडेजा आणि राहुल शर्मा यांच्यावर असेल.
दोन टी-20 सामनेही टीम इंडिया खेळणार
कसोटी मालिकेनंतर येत्या 1 आणि 2 फेब्रुवारी रोजी भारतीय संघ दोन टी-20 सामन्यांत खेळेल. यानंतर र्शीलंकेचा समावेश असलेल्या तिरंगी मालिकेला 5 फेब्रुवारीपासून प्रारंभ होईल.
भारतीय संघ : महेंद्रसिंग धोनी (कर्णधार आणि यष्टिरक्षक), वीरेंद्र सेहवाग, गौतम गंभीर, सचिन तेंडुलकर, विराट कोहली, रोहित शर्मा, सुरेश रैना, रवींद्र जडेजा, आर. अश्विन, उमेश यादव, प्रवीणकुमार, विनयकुमार, मनोज तिवारी, राहुल शर्मा, पार्थिव पटेल, इरफान पठाण, जहीर खान.