आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sachin Tendulkar Set To Watch Bahrain Grand Prix With Family

सचिन घेणार बहारीन ग्रँड प्रिक्सचा आनंद

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

दुबई - पुढील महिन्यात दुबईला होणार्‍या बहारीन ग्रँड प्रिक्स पाहण्यासाठी सचिन तेंडुलकर सहकुटुंब जाणार आहे. बहारीनमधील पहिलीच फॉर्म्युला वन स्पर्धा 4 ते 6 एप्रिलदरम्यान रंगणार असून त्या वेळी सचिन तिथे उपस्थित राहणार आहे. सचिनचे मित्र असलेले बहारीनचे उद्योजक मोहंमद दादाभाई यांनी याबाबतची माहिती जाहीर केली. सचिनने निमंत्रण मंजूर केल्याने भारत आणि बहारीनमधील संबंधांना पुन्हा एकदा उजाळा मिळणार असल्याचेही दादाभाई यांनी नमूद केले. सचिन सहकुटुंब येणार असल्याने या स्पर्धेलादेखील चार चाँद लागणार असल्याचे दादाभाई यांनी सांगितले.