Home | Sports | From The Field | sachin tendulkar sun arjun in sedey

ज्युनियर ‘सचिन’ला गोलंदाजीचे धडे!

वृत्तसंस्था | Update - Jan 02, 2012, 05:20 AM IST

सचिनच्या महाशतकाचा साक्षीदार होण्यासाठी ‘ज्युनियर सचिन’ म्हणून ओळखला जाणारा अर्जुन तेंडुलकर सिडनेत आई अंजलीसोबत दाखल झालेला आहे.

  • sachin tendulkar sun  arjun in sedey

    सिडने: क्रिकेटचे लाखो चाहते सचिनच्या आंतरराष्ट्रीय सामन्यांतील 100 व्या शतकाच्या प्रतीक्षेत आहेत. याच महाशतकाचा साक्षीदार होण्यासाठी ‘ज्युनियर सचिन’ म्हणून ओळखला जाणारा अर्जुन तेंडुलकर सिडनेत आई अंजलीसोबत दाखल झालेला आहे. दुस-या कसोटी सामन्याअगोदर झालेल्या सरावात अर्जुनने गोलंदाजीचे धडे गिरवले. गोलंदाजी करून कांगारूंना फोडून काढण्यासाठी भारतीय फलंदाजांना अर्जुनने धीर दिला. नेटवर झालेल्या सरावादरम्यान, सचिनसह प्रशिक्षक डंकन फ्लेंचर हे देखील उपस्थित होते.
    येत्या मंगळवारपासून भारत, ऑस्ट्रेलिया यांच्यातील दुस-या कसोटीला सुरुवात होणार आहे. त्यामुळे भारतीय संघ सिडनीत कसून सराव करत आहे. सकाळपासून सरावासाठी आलेल्या संघामध्ये अर्जुनचा देखील सहभाग होता. अर्जुन याने वीरेंद्र सेहवाग, गौतम गंभीर व विराट कोहली यांच्यासाठी गोलंदाजी केली. सरावादरम्यान, अर्जुन हादेखील अधिक उत्साहित होता. त्याला वेळोवेळी प्रशिक्षक फ्लेंचर यांनी देखील मार्गदर्शन केले. अर्जुनचा उत्साह पाहून सचिनदेखील भारावला होता.

Trending