फोटो – आत्मचरित्राच्या प्रकाशनावेळी भाऊ अजित आणि पत्नी अंजली समवेत सचिन
सिडने - ऑस्ट्रेलियाचे दिग्गज क्रीडापत्रकार रॉबर्ट क्रेडॉकने
सचिन तेंडुलकरवर अत्यंत कठोर शब्दात टीका केली आहे. सचिनच्या 'प्लेइंग इट माय वे' या आत्मचरित्रावरुन त्यांनी सचिन स्वार्थी व धूर्त राजकारणी असल्याची टीका केली. एवढेच नाही तर सचिनचा 25 वर्षांपूर्वींचा खरा चेहरा समोर आल्याचे त्यांनी 'फॉक्स स्पोर्ट्स' या वेबसाईटवर लिहिलेल्या लेखामध्ये म्हटले आहे.
क्रेडॉकने लिहिले आहे की, सचिनला
आपल्या ताकदीचा अंदाज आहे. म्हणूनच त्याने क्रिकेटची कारकीर्द संपल्यानंतर हा वाद उकरुन काढला आहे. संधी मिळताच त्याने ऑस्ट्रेलियन क्रिकेटचा समचार घेतला. त्याने चॅपल यांच्यावर टीका केली.
एवढेच नाही तर, सचिनने इयान चॅपलवर त्याला निवृत्ती घेण्यास भडकवत असल्याचाही आरोप केला आहे. एंड्रयू सायमंड्स आणि
हरभजन सिंग मध्ये झालेल्या मंकीगेट प्रकरणावरुन सचिनने ऑस्ट्रेलियाला टारगेट केले आहे.
मंकीगेटची तुलना वेस्ट इंडीज सोबत
क्रेडॉकने मंकीगेट वादाची तुलना
वेस्ट इंडीज क्रिकेटशी केली आहे. मंकीगेट प्रकरणामुळे
टीम इंडिया ऑस्ट्रेलिया दौरा अर्धवट सोडून मायदेशी परतला होता.
'स्वार्थी आहे सचिन'
पत्रकार क्रेडॉकने सचिनला स्वार्थी संबोधले. ‘करियर दरम्यान सचिन एकही शब्द काढत नव्हता. उलट वैयक्तिक धावांवर भर देत होता. कारण त्याला करिअर नष्ट होण्याची भीती होती. आता क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर सचिनला त्या प्रकरणांवर बोलण्यात रस काय असा प्रश्नही क्रेडॉक याने उपस्थित केला.
सचिनच्या आदर्शावरही केली टीका
सचिन नेहमी जॉन मॅकेनरो प्रमाणे राहू इच्छित होता, परंतु भीतीमुळे तो तसा वागत नव्हता. सचिनचचा आदर्श असलेला टेनिसपटू मॅकेनरो अत्यंत रागीट स्वभावाचा होता. सचिन आपला प्रत्येक राग मॅकेनरो प्रमाणे स्पष्ट करु इच्छित होता परंतु करिअच्या चिंतेने तो असे करत नव्हता. करिअरमधून निवृत्ती घेतल्यानंतर मात्र त्याने पुस्ताकाच्या रुपातून हा राग काढला आहे. असे क्रेडॉकने यांनी लिहिले आहे.
ऑस्टेलियात क्रेडॉकवरच टीका
रॉबर्ट क्रेडॉकने सचिन विषयी काढलेल्या अनुद्गारावर ऑस्ट्रेलियातील क्रिडाप्रेमींनी त्यांच्या विरुध्द प्रतिक्रिया नोंदवल्या आहेत. ‘क्रेडॉक फक्त बातमीसाठी आणि स्वत:च्या प्रसिध्दी साठी सचिनला व्हिलन बनवू पाहत असल्याचे कित्येक चाहत्यांनी म्हटले आहे.’
पुढील सलाइडवर वाचा, सचिन चॅपेलच्या बाबतीत काय म्हटले..