आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकर 200व्‍या कसोटीनंतर होणार निवृत्त

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- गेली 24 वर्षे क्रिकेटच्‍या मैदानावर साम्राज्‍य गाजवणारा आणि तमाम भारतीयांसाठी क्रिकेटचा देव असलेला मास्‍टर ब्‍लास्‍टर सचिन तेंडुलकर अखेर निवृत्त होणार आहे. सचिनने कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली असून 200 वा कसोटी सामना त्‍याच्‍या कारकिर्दीतील अखेरचा सामना ठरणार आहे. निवृत्तीबाबत सचिनने बीसीसीआयला कळविले आहे. वेस्‍ट .इंडिजविरुद्ध सचिन तेंडुलकर अखेरची कसोटी खेळणार आहे.

सचिनने ट्विटरवरुन निवृत्तीबाबत सांगितले, की भारतासाठी क्रिकेट खेळावे हे माझे आयुष्‍यातील सर्वात मोठे स्‍वप्‍न होते. गेल्‍या 24 वर्षांपासून मी हे स्‍वप्‍न जगत आलो आहे. क्रिकेट खेळण्‍याव्‍यतिरिक्त आयुष्‍याची कल्‍पनाच करणे अतिशय कठीण आहे. कारण वयाच्‍या 11 व्‍या वर्षापासून मी हेच करत आलो आहे. भारतासाठी खेळेणे हा माझ्यासाठी फार मोठा सन्‍मान होता. मी बीसीसीआयचे आभार मानतो. बीसीसीआयने मला भरपूर दिले. निवृत्त होण्‍यासाठी हीच वेळ असल्‍याचे मला वाटले. त्‍यानंतर निवृत्तीचा निर्णय घेण्‍यासाठी सहमती दिल्‍याबद्दलही मी बीसीसीआयचे आभार मानतो. संयम आणि समजूतदारी दाखवणा-या माझ्या कुटुंबियांचेही मी आभार मानतो. माझे तमाम चाहते आणि शुभेच्‍छुकांचेही मी आभार मानतो.