आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sachin Tendulkar To Retire After 200th Test Icc Confirms

PHOTOS : मैदान जिंकणारा विक्रमादित्य

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सचिन रमेश तेंडुलकर.. या नावातच सारे क्रिकेटविश्व सामावलेले आहे. सचिन म्हणजे भारतीय क्रिकेटला पडलेले सोनेरी स्वप्नच जणू. त्याचा जन्मच मुळी क्रिकेट आणि विक्रमांसाठी झाला. विक्रमांची अनेक शिखरे, धावांचे डोंगर उभारल्यानंतर त्याची ‘रनमशीन’ तब्बल 24 वष्रे मैदानावर धडाडली. भारतीय क्रिकेटच्या या दैवताने अनेक सुवर्णक्षणांचा नजराणा चाहत्यांना दिला. अब्जावधी चाहत्यांच्या अपेक्षांचे ओझे सर्मथपणे दुर्दम्य आत्मविश्वासासह शिवधनुष्याप्रमाणे पेलले. कोट्यवधींचा हीरो, आयडॉल, रोल मॉडेल आणि अनेकांच्या देवाने गुरुवारी कसोटी क्रिकेटचे धनुष्य जमिनीवर ठेवण्याचा निर्णय घेतला. नोव्हेंबरमध्ये वेस्ट इंडीजविरुद्ध दोन कसोटींनंतर निवृत्त होणार्‍या सचिन तेंडुलकरला कोट्यवधी चाहत्यांकडून हा मानाचा मुजरा..!!!