आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sachin Tendulkar Tob Conferred Bharat Ratna News In Marahti

फक्त तिन दिवसांत झाला होता सचिनला \'भारतरत्न\' देण्याचा निर्णय, उद्या होणार सन्मानित

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरला 4 फेब्रुवारी रोजी देशाचा सर्वोच्च नागरी सन्मान 'भारतरत्न'ने गौरविले जाणार आहे. राष्ट्रपती प्रणव मुखर्जी राष्ट्रपती भवनात सचिनला 'भारतरत्न'ने सन्मानित करणार आहेत. मात्र, त्याआधी अशी माहिती पुढे येत आहे, जी सचिनच्या 'भारतरत्न'वर वाद निर्माण करण्याची शक्यता आहे. सचिनला 'भारतरत्न'ने सन्मानित करण्याचा निर्णय केवळ तीन दिवसांत घेण्यात आला होता.
सचिनला 'भारतरत्न'ने सन्मानित करावे ही मागणी कित्येक वर्षांपासून सुरु होती. गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये सचिनने जेव्हा क्रिकटमधून निवृत्ती घेण्याचा निर्णय घेतला, त्याच दिवशी राष्ट्रपती भवनातून सचिनला सर्वोच्च नागरी सन्मान देण्याचाही निर्णय झाला.
या घोषणेनंतर देशभरातील सचिनच्या चाहत्यांना आनंद साजरा केला होता. दुसरीकडे या घोषणेमुळे वादही निर्माण झाला होता. काहींची मागणी होती, की हॉकेचे जादूगार ध्यानचंद यांना हा सन्मान मिळाला पाहिजे होता. सचिनच्या काही टीकाकारांनी तर त्याने करात सवलतीची मागणी केली असल्याचेही तर्क त्यासाठी मांडले. काही जागरुक नागरिकांनी माहिती अधिकारांतर्गत सचिनला हा सन्मान कसा मिळाला, कशी त्याला मंजुरी मिळाली याची माहिती मागितली.
मध्यप्रदेशातील बैतूल जिल्ह्यातील हेमंत दुबे यांनी महिती अधिकारांतर्गत याचिका दाखल करुन ही माहिती मिळविली आहे.

पुढील स्लाइडमध्ये वाचा, कशी पार पडली प्रक्रिया..