आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sachin Tendulkar Won More Then 70 Test Cricket Match

सचिन: तब्बल 70 पेक्षा अधिक विजयी कसोटी सामने

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कोलकाता कसोटीत टीम इंडियाने वेस्ट इंडीजवर शानदार विजय मिळवला होता. मात्र, त्या सामन्यात सचिन अपेक्षेनुसार कामगिरी करू शकला नाही. भारताच्या विजयानंतर तेंडुलकरच्या नावे आणखी एक विक्रम जमा झाला. देशाकडून 70 पेक्षा अधिक कसोटी सामने जिंकून देणारा तो पहिला भारतीय खेळाडू ठरला आहे. सचिन तब्बल 71 वेळा विजयी भारतीय कसोटी संघाचा सदस्य होता. सचिनच्या कसोटी पदार्पणानंतर लगेचच टीम इंडियाचा विजयोत्सव सुरू झाला. यानंतर सचिन संघात असताना भारताने तब्बल 70 कसोटी सामन्यांत विजय मिळवला. देशाकडून विजय मिळवून देण्याच्या बाबत सचिन नंबर वन भारतीय निश्चितपणे आहे. मात्र, जगात असे आठ खेळाडू आहेत, जे याबाबत सचिनच्या पुढे आहेत. सर्वाधिक विजयी सामन्यांत खेळण्याचा रेकॉर्ड ऑस्ट्रेलियाच्या रिकी पाँटिंगच्या नावे आहे. पंटर ऊर्फ पाँटिंगने ऑस्ट्रेलियाकडून 108 विजयी सामन्यांत सहभाग घेतला होता.
भारताच्या नंबर वन विजयात सचिनचे शतक
टीम इंडियाने कसोटीत सर्वांत मोठा विजय 25 मे 2007 रोजी बांगलादेशविरुद्ध मिळवला होता. भारताने तो सामना एक डाव आणि 239 धावांनी जिंकला. या सामन्यात सचिनने नाबाद 122 धावा काढल्या होत्या. सचिन या सामन्यात विजयाचा शिल्पकार ठरला.
सचिनच्या नावे असेही विक्रम
खेळाडू विजयी कसोटी
रिकी पाँटिंग 108 सामने
शेन वॉर्न 92 सामने
स्टीव्ह वॉ 86 सामने
ग्लेन मॅकग्राथ 84 सामने
जॅक कॅलिस 81 सामने
मार्क बाऊचर 74 सामने
अ‍ॅडम गिलख्रिस्ट 73 सामने
मार्क वॉ 72 सामने
मॅथ्यू हेडन 71 सामने
सचिन तेंडुलकर 71 सामने
संकलन: विवेक राठोड