आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

VIDEO: गेल्‍या वर्षी याच दिवशी मास्‍टर ब्‍लास्‍टरने रचला होता इतिहास...

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

गेल्‍यावर्षी 16 मार्च रोजीच मास्‍टर ब्‍लास्‍टर सचिन तेंडुलकरने आपले आंतरराष्‍ट्रीय क्रिकेटमधील बहुप्रतिक्षित शतकांचे शतक पूर्ण केले होते. आशिया चषकात बांगलादेश विरूद्धच्‍या एकदविसीय सामन्‍यात त्‍याने या विक्रमाला गवसणी घातली होती. एकदिवसीय सामन्‍यातील 49 वे आणि आंतरराष्‍ट्रीय क्रिकेटमधील हे त्‍याचे 100 वे शतक होते.

उल्‍लेखनीय म्‍हणजे याचदिवशी विद्यमान राष्‍ट्रपती आणि तत्‍कालीन अर्थमंत्री प्रणव मुखर्जी हे संसदेत अर्थसंकल्‍प मांडत होते. सचिनच्‍या शतकामुळे भारतातील माध्‍यमांनी दिवसभर महाशतकाचाच मुद्या चर्चेत आणला होता.

सचिनबरोबर त्‍यावेळी सुरेश रैना फलंदाजीस होता. या सामन्‍यात सचिनने 114 धावा केल्‍या होत्‍या. मात्र, सचिनच्‍या या महाशतकानंतरही टीम इंडियाला बांगलादेशविरोधात पाच विकेटने पराभव स्‍वीकारावा लागला होता.

खास वाचकांसाठी divyamarathi.com सादर करतोय सचिनच्‍या महाशतकाचा व्हिडिओ...

सौजन्‍य- युट्यूब