आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sachin Tendulkar's 200th Test Will Be In Mumbai: BCCI

अखेरची कसोटी वानखेडेवरच व्हावी ही इच्छा : सचिन

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - आपली अखेरची क्रिकेट कसोटी (200वी) आपल्या कर्मभूमीत वानखेडे स्टेडियमवर व्हावी, अशी इच्छा सचिन तेंडुलकरने बीसीसीआयकडे व्यक्त केल्यामुळे गेले अनेक दिवस सुरू असलेल्या एका वादाला पूर्णविराम मिळण्याची शक्यता आहे.

सचिन तेंडुलकरने निवृत्तीचा निर्णय बीसीसीआयला कळवल्यानंतर आपली अखेरची कसोटी वानखेडे स्टेडियमवर व्हावी, अशी इच्छा व्यक्त केली होती. त्यामुळे या कसोटीच्या आयोजनासाठी आपले घोडे मध्येच दामटण्याचा प्रयत्न करणार्‍या बंगाल क्रिकेट असोसिएशनला आणि क्रिकेटपेक्षा अन्य गोष्टींवर लक्ष केंद्रित केलेल्या सीसीआय या दोन संघटनांना धक्का बसला आहे.

बंगाल क्रिकेट असोसिएशनने सचिनची अखेरची कसोटी मुंबईत व्हावी, अशी मागणी करताना वानखेडे स्टेडियमपेक्षा इडन गार्डनची आसनक्षमता अधिक असल्याचा दावा पुढे केला होता. अशा महत्त्वाच्या प्रसंगाचे साक्षीदार अधिकाधिक लोकांनी व्हावे, हा यामागचा हेतू असल्याचे त्यांनी म्हटले होते. सीसीआयने मात्र ब्रेबॉर्न स्टेडियमवर सामना आयोजित करण्याची मागणी करताना र्शीनिवासन यांच्या बाजूने दिलेल्या मताच्या कौलाची परतफेड करवून घेण्याचा घाट घातलेला दिसतो. सचिन ब्रेबॉर्न स्टेडियमवर खेळला होता, असा युक्तिवादही त्यांच्या वतीने करण्यात येत आहे.

मात्र, दस्तुरखुद्द सचिननेच स्वत:च वानखेडे स्टेडियमवर आपली अखेरची कसोटी व्हावी, अशी मागणी केल्यामुळे बीसीसीआयपुढेही पर्याय उरलेला नाही. मुंबई क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष रवी सावंत यांनीही सचिन तेंडुलकरने आपली अखेरची कसोटी मुंबईत व्हावी, अशी विनंती बीसीसीआयला केल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. मुंबई क्रिकेट असोसिएशनने यापूर्वीच सचिनची 200वी कसोटी मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर आयोजित करावी, अशी विनंती करणारे पत्र बीसीसीआयला दिले होते.