क्रिकेटचा ‘देव’ म्हणून गणल्या गेलेला सचिन तेंडुलकर विराटने त्याला चरणस्पर्श करताच रडला होता. सचिनच्या अंतीम सामन्यावेळी विराटने सचिनला स्पेशल गिप्ट दिले होते आणि चरणस्पर्श केला होता. असा उल्लेख स्वत: सचिन तेंडुलकरने
आपल्या ऑटोबायोग्राफी 'प्लेइंग इट माय वे' मध्ये केला आहे.
आपल्यासारखा सर्वश्रेष्ट कोणी भेटला नाही
200 वा कसोटी सामना खेळल्यानंतर सचिन अत्यंत भावूक झाला होता. तेव्हा विराटला त्याचा पित्याकडून विराट त्याला भेटायला गेला. विराटच्या पित्यांच्या निधनानंतर त्यांची आठवण म्हणून जपून ठेवलेला बॉक्स विराटने सचिनला भेट दिला होता. आणि आपल्यासारखा सर्वश्रेष्ट अद्याप कुणीच नाही म्हणून चरणस्पर्श केला होता. तेव्हा सचिनच्या डोळ्यात अश्रु तराळले.
नकार दिला... परंतु नाही मानला विराट
‘तू माझ्या पाया का पडतोस ? तू माझ्या धाकट्या भावाप्रमाणे आहेस’ असे सचिनने विराटला म्हटले होते. परंतु ‘मी तूमचा आदर करतो आणि तुमची कमी मला नेहमीच जाणवेले’, असे उद्गार विराटने काढले होते. या वाकयामूळे सचिन एवढा भाऊक झाला होता की, त्याने विराटला बाहेर जायचे सांगून एकटा मनसोक्त रडला होता.
गिप्ट केले वापस
‘हे गिप्ट तुझ्या वडिलांची स्मृती असून ती जपून ठेव यामुळे तुझे भविष्य घडेल.’ असे म्हणून सचिनने विराटचे गिप्ट वापस केले. त्यामुळेच असे म्हटल्या जाते की, सचिनचे रेकॉर्ड कोणी तोडू शकतो तर, तो फक्त विराट..!
पुढील स्लाइडवर पाहा, सचिनचे भावूक छायाचित्रे....