आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sachin Tendulkar's Tweet Sets Off Speculations Of Coming Out Of Retirement

फोटो ट्विट करून सचिन म्हणाला - विचार करा, अन् लोक लागले कामाला

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सचिनने शनिवारी ३.३० वाजता हा फोटो ट्विट केला. मुंबई इंडियन्सचे हेल्मेट घालताना. लिहिले- गेस व्हॉट? मग काय विचारता, लोकांनी ट्विटरवर कॉमेंट सुरू केल्या.
अशाही इच्छा व्यक्त
- तुझ्याविना क्रिकेट बोअरिंग आहे. तू नेहमी खेळत राहा.
- क्रिकेटचा पुनर्जन्म. देव नव्या अवतारात.
- गॉड, प्लीज १ सामना खेळ. लाखोंना आनंद होईल.

अन् सल्लेही मिळाले
- सर प्लीज.. तुम्ही तरी शाहीद आफ्रिदी होऊ नका.
- सर, एवढ्याने काय समजेल? काहीतरी सांगा.
- सचिनला सर्व माहीत आहे. तो समजूतदारपणा दाखवेल.

- 2100 पेक्षा जास्त वेळा फोटो रिट्विट झाला
- 3500 लोकांनी त्याला फेव्हरेट करून केले व्हायरल

रात्री उशीरा सचिनचे ट्विट :"जे समजायचे ते समजा... मी मुंबई इंडियन्सच्या डग आऊटमध्ये राहणारच. होम ग्राउंडवर हंगामातील पहिल्या सामन्यात आपल्या सुपरस्टार्सना प्रोत्साहन देईन.