आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sachin Tenrulkar Playing First Ball To Waqar Younis In Test Cricket

सचिन झाला निवृत्त, जाणून घ्‍या एक खास योगायोग

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

क्रिकेटचा विक्रमादित्‍य सचिन तेंडुलकर आंतरराष्‍ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त झाला. वेस्‍ट इंडिजविरुद्ध मुंबईत सचिन कारकिर्दीतील 200 वी कसोटी खेळला. गुरुवारी सामन्‍यातील दुस-या दिवशी सचिन पहिल्‍या दिवशी नाबाद असलेला सचिन दुस-या दिवशी 74 धावा काढून बाद झाला. सचिनला दुस-या डावात फलंदाजीची संधी मिळाली नाही. त्‍यामुळे 15 नोव्‍हेंबर 2013 हा दिवस त्‍याच्‍यासाठी फलंदाजीचा अखेरचा दिवस ठरला. योगायोग असा की याच दिवशी 1989 मध्‍ये कराची ये‍थे सचिन पहिल्‍यांदा कसोटीमध्‍ये मैदानात उतरला होता. कारकिर्दीतील पहिला चेंडू सचिनने खेळला तो वेगवान गोलंदाज वकार युनुसचा. वकारनेही त्‍याच सामन्‍यात पदार्पण केले होते.

आम्‍ही या निमित्ताने तो क्षण तुमच्‍यासमोर घेऊन येत आहोत. एक व्हिडिओ, जो सचिनच्‍या कारकिर्दीतील पहिल्‍या धावांचा साक्षीदार आहे.

पुढील स्‍लाईडवर क्लिक करा आणि पाहा सचिनच्‍या पहिल्‍या कसोटी आणि वन डे शतक आणि वन डे क्रिकेटमधील पहिल्‍या द्विशतकाची क्षणचित्रे...