आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एडीलेडमध्‍ये सचिन खेळणार 'टॉप गिअर'मध्‍ये!

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एडीलेडः टीम इंडियाचे इंग्‍लंड आणि ऑस्‍ट्रेलियातील कसोटी सामन्‍यांच्‍या मालिकेत पानिपत झाले. ऑस्‍ट्रेलियाविरुद्ध सुरु असलेल्‍या मालिकेत भारतीय संघ 3-0 ने मागे आहे. चौथ्‍या कसोटीत टीम इंडिया दमदार प्रदर्शन करेल, अशी अपेक्षा व्‍यक्त करण्‍यात येत आहे. तर महाशतकाच्‍या उंबरठ्यावर असलेल्‍या सचिन तेंडुलकरकडूनही यावेळी चाहते मोठी अपेक्षा ठेवून आहेत. एडीलेडमध्‍ये तो आक्रमक खेळ करणार असल्‍याचे संघातील एका सहका-याने सांगितले आहे. नाव न सांगण्‍याच्‍या अटीवर त्‍याने सांगितले की, सचिन प्रचंड उत्‍साहात आहे. तो केवळ एकाच शतकाने थांबणार नाही. हा टप्‍पा पार केल्‍यानंतर एका मोठ्या खेळीचीही अपेक्षा आहे. तो द्विशतकी झळकावू शकतो. सचिनने या सामन्‍यात टॉप गियरमध्‍ये फलंदाजी करण्‍याचा निर्णय घेतला आहे.'
हे तर झाले एका आगामी कसोटीपुरते. या सगळ्या चर्चेनंतर एक मोठा प्रश्‍न निर्माण होतो, तो म्‍हणजे वन डेमधील प्रदर्शनाचा. टीम इंडियाची कसोटीत वाताहत झालीच आहे. परंतु, एक दिवसीय क्रिकेटमध्‍ये विश्‍वचषक जिंकल्‍यानंतर टीम इंडियाचे प्रदर्शन कसे राहील? विश्‍वचषक जिंकल्‍यानंतर टीम इंडिया प्रथमच एका मोठ्या स्‍पर्धेत सहभागी होत आहे. कसोटी मालिकेनंतर ऑस्‍ट्रेलिया आणि श्रीलंका यांचा सहभाग असलेल्‍या तिरंगी स्‍पर्धेत भारत खेळणार आहे. त्‍यात सचिन तेंडुलकर व इतर खेळाडु वन डेमधील लौकिक कायम ठेवतील काय, हाच खरा प्रश्‍न आहे.
या मालिकेत सचिन तेंडुलकरने इतर फलंदाजांच्‍या तुलनेत चांगले प्रदर्शन केले आहे. सचिनने 6 डावांमध्‍ये 41.50 अशा सरासरीने 249 धावा काढल्‍या आहेत. परंतु, त्‍याच्‍या फलंदाजीमध्‍ये नेहमीप्रमाणे जाणवणारी सफाई नव्‍हती. सचिनने या मालिकेत अतिशय बचावात्‍मक खेळ केला आहे. मध्‍येच तो फटकेबाजी करतो. तर मध्‍येच तो बॅट म्‍यानात टाकतो. त्‍याच्‍या अशा खेळीवरुन टीकाही झाली. ऑस्‍ट्रेलियन खेळाडुंनीही त्‍याच्‍या फलंदाजीतील कच्‍चे दुवे मोठ्या चवीने सांगून त्‍याच्‍यावर दबाव टाकण्‍याचा प्रयत्‍न केला. कदाचित महाशतकाचे दडपण त्‍याच्‍या खेळीतून जाणवायला सुरुवात झाली आहे, असे जाणकारांचे म्‍हणणे आहे. परंतु, एडीलेड कसोटीमध्‍ये सचिन सर्व टीकेला उत्तर देण्‍यास सज्‍ज झाला आहे. ही कसोटी कदाचित ऑस्‍ट्रेलियातील त्‍याची अखेरची कसोटी ठरू शकते. त्‍यामुळे मोठ्या दणक्‍यात त्‍याला ही कसोटी खेळायची आहे, असा इरादा त्‍याने निश्चित केल्‍याचे बोलले जात आहे.
महाशतकाबाबत सचिनची थट्टा उडविताहेत पाकिस्तानी माध्‍यमे
वॉर्नर = सचिन + द्रविड + लक्ष्मण + सेहवाग
संघाच्‍या पराभवास सचिन,लक्ष्‍मण आणि द्रविड जबाबदार!
मी शंभराव्या शतकाच्या विचारात नाही : सचिन