आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कांगारूंविरुद्ध सचिन सर्वात यशस्वी फलंदाज

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - येत्या 22 फेब्रुवारीपासून ऑस्ट्रेलियाविरुद्ध सुरू होणा-या कसोटी मालिकेत सर्वांची नजर मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरवर असणार आहे. त्याने ऑस्ट्रेलियाविरुद्ध सर्वाधिक 20 शतके झळकवली आहेत. कसोटीत त्याने करिअरमधील सर्वोत्तम नाबाद 241 धावा ऑस्ट्रेलियाविरुद्ध काढल्या. ऑस्ट्रेलियाविरुद्ध सचिनने वनडे व कसोटीचे एकूण 106 सामने खेळले आणि यामध्ये एकूण 6515 धावा काढल्या आहेत. यादरम्यान त्याच्या नावावर अनेक चांगल्या खेळीची कामगिरी नोंदवली गेली आहे. ऑस्ट्रेलियातील अनेक दिग्गज गोलंदाज हे नेहमी सचिनच्या निशाण्यावरच राहिले आहेत. यामध्ये 1992 मध्ये पर्थ येथील 114 धावा आणि शारजातील सर्वोत्कृष्ट कामगिरीचा समावेश आहे. सचिनच्या ऑस्ट्रेलियाविरुद्ध कामगिरीचा गौरव क्रीडा पत्रकार धर्मेंद्र पंत यांनी आपल्या पुस्तकात ‘सचिनची शंभर शतके’ अशा शब्दात केला.

कसोटी धावा शतक अर्धशतक
35 3438 11 15
वनडे धावा शतक अर्धशतक
71 3077 09 15