आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सचिन, अभिषेकची अर्धशतके

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - नवी दिल्ली येथील पालम ग्राउंडवर सुरू असलेल्या सेनादलाविरुद्ध रणजी उपांत्य फेरीच्या सामन्यात मुंबईने 78 षटकांच्या खेळानंतर 6 बाद 199 धावा केल्या. दिल्लीतील थंडी, अपुरा सूर्यप्रकाश आणि सेनादलाच्या खेळाडूंची सुस्ती यामुळे दिवसातील 12 षटके कमी टाकली गेली. अभिषेक नायरच्या अप्रतिम 70 धावा आणि सचिन तेंडुलकरची 56 धावांची संयमी खेळी यामुळेच मुंबईला 199 धावसंख्या गाठता आली.

अभिषेक नायर 6 बाद 169 धावसंख्येवर बाद झाल्यानंतर 26 धावांवर खेळत असलेल्या आदित्य तरेने अजित आगरकरच्या साथीने दिवसअखेर 40 धावांची अभेद्य भागीदारी केली.
पालम मैदानाची खेळपट्टी पहिल्या दिवशीच फिरकी गोलंदाजांनाही सहायक ठरत आहे. चेंडू सरपटी येत असल्यामुळे स्लीपपर्यंत दोन टप्पे पडून जात आहे. उपांत्य फेरीसारख्या महत्त्वाच्या सामन्यासाठी निकृष्ट दर्जाची खेळपट्टी तयार केल्याबद्दल आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. या खेळपट्टीवर मुंबई ते पहिल्या डावात 250 ते 275 धावसंख्येपर्यंत मजल मारल्यास ती धावसंख्या उत्तम असेल, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

सौराष्‍ट्राच्या 5 बाद 274 धावा
कर्णधार जयदेव शाह (87), शेल्डन जॅक्सन (नाबाद 70) आणि सितांशू कोटक (54) यांच्या
अर्धशतकांच्या बळावर सौराष्‍ट्राने पंजाबविरुद्ध रणजी करंडकाच्या उपांत्य सामन्यात पहिल्या दिवशी पाच बाद 274 धावा काढल्या. पंजाबकडून सिद्धार्थ कौलने 64 धावांत दोन विकेट, हरभजनने 59 धावांत एक तर बिपुलने 10 धावांत एक आणि कोहलीने 14 धावांत एक विकेट घेतली.