आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

SACHIN\'S LAST TEST: पहिल्‍या दिवसाचा रोमांच; भारत आघाडीवर, सचिन मैदानावर

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- सलामीवीर मुरली विजय बाद झाला, अन् ज्‍या क्षणाची वाट सगळे जग पाहत होते. तो क्षण जुळून आला. क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकर मैदानात अवतरला आणि स्‍टेडिअममध्‍ये एकच जल्‍लोष सुरू झाला. सचिनेही त्‍यांना निराश न करता आपल्‍या लौकिकाला साजेशी खेळी केली. दिवसअखेर सचिन 38 धावांवर नाबाद असून त्‍याचा सहकारी चेतेश्‍वर पुजारा 34 धावांवर खेळत आहे. टीम इंडिया अजूनही 25 धावांनी पिछाडीवर आहे.

विंडीजच्‍या 182 धावांना प्रत्‍युत्तर देण्‍यासाठी मैदानात उतरलेल्‍या टीम इंडियाच्‍या सलामीवीरांनी आक्रमक पवित्रा घेतला होता. भारतीय मैदानावर आपल्‍याच टीमचा खेळाडू बाद झाल्‍यानंतर जल्‍लोष होण्‍याची ही कदाचित पहिलीच वेळ आहे. सचिन मैदानात फलंदाजीस आल्‍यानंतर विंडीजच्‍या खेळाडूंनी त्‍याला गार्ड ऑफ ऑनर दिले.


शिखर धवन पाठोपाठ त्‍याचा दुसरा साथीदार मुरली विजयही तंबूत परतला. अर्धशतकाच्‍या नजीक पोहोचलेल्‍या विजयला शिलिंगफोर्डनेच टिपले. विजयच्‍या बॅट-पॅडला लागून उडालेला चेंडू डॅरेन सॅमीने टिपला. विजयने 43 धावा केल्‍या.

चांगल्‍या सुरूवातीनंतरही आक्रमक खेळण्‍याच्‍या नादात टीम इंडियाची सलामीवीर शिखर धवन लवकर बाद झाला. 28 चेंडूत 33 धावा करणा-या धवनला शिलिंगफोर्डने बाद केले. शिलिंगफोर्डला स्‍वीप शॉट खेळण्‍याच्‍या प्रयत्‍नात त्‍याचा उडालेला झेल स्‍क्‍ेवअर लेगला उभ्‍या असलेल्‍या चंदरपॉलने टिपला.


तत्‍पूर्वी, नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्‍याचा कर्णधार धोनीचा निर्णय टीम इंडियाच्‍या फिरकीपटूंनी सार्थ ठरवला. प्रग्‍यान ओझाच्‍या 5 विकेट आणि त्‍याला 3 विकेट घेत उत्तम साथ दिलेल्‍या आर अश्विनमुळे वेस्‍ट इंडीजचा पहिला डाव अवघ्‍या 182 धावांवर संपुष्‍टात आला. किरॉन पॉवेलच्‍या 48, डॅरेन ब्राव्‍हो 29 आणि आपली 150वी कसोटी खेळणा-या चंदरपॉलच्‍या फलंदाजीमुळे विंडीजला 182 धावा करता आल्‍या. अधिक वाचण्‍यासाठी क्लिक करा पुढच्‍या स्‍लाईडला...