आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

\'सचिन्मय\': भारतीय संघाने दिला विजयी निरोप, टीम इंडियाचा एक डाव-126 धावांनी विजय

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- वानखेडे स्‍टेडिअमवरील सचिन तेंडुलकरच्‍या अखेरच्‍या ऐतिहासिक कसोटीत टीम इंडियाने एक डाव आणि 126 धावांनी विंडीजचा दणदणीत पराभव केला. मोहमंद शमीने गॅब्रिएलचा त्रिफळा उडवून विजयावर शिक्‍कामोतर्ब केला. फिरकीपटू प्रग्‍यान ओझाच्‍या 49 धावांत पाच बळी (एकूण 10 बळी), आर अश्विनच्‍या चार बळींमुळे टीम इंडियाने तिस-याच दिवशी सचिनला विजयाची भेट दिली. विंडीजचा डाव 187 धावांतच संपुष्‍टात आला.


शमीने अखेरची विकेट घेतल्‍यानंतर पॅव्‍हेलियनमध्‍ये परतणारा सचिन भावूक झालेला दिसला. त्‍याला आपले अश्रू आवरता आले नाही. त्‍याने मैदानात सर्वांना अभिवादन करीत पॅव्‍हेलियन गाठले.


दहा बळी घेणा-या प्रग्‍यान ओझाला सामनाविराचा तर आपल्‍या पहिल्‍या कसोटी मालिकेत सलग दोन शतके ठोकणा-या रोहित शर्माला मालिकावीराचा पुरस्‍कार देण्‍यात आला. सामन्‍यानंतरच्‍या समारंभास सचिनबरोबर मैदानात पत्‍नी अंजली तेंडुलकर, मुलगा अर्जुन तेंडुलकर आणि मुलगी सारा तेंडुलकर आले होते.


सचिनला एमसीएचे अध्‍यक्ष आणि केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांच्‍या हस्‍ते श्रीलंकन सरकारची ट्रॉफी देण्‍यात आली. शिवाय सचिनचे वडील दिवंगत रमेश तेंडुलकर यांनी पाच वर्षे मुंबई पोलिसांमध्‍ये काम केल्‍यामुळे मुंबईचे पोलिस आयुक्‍त डॉ. सत्‍यपालसिंग यांनी सचिनचा सत्‍कार केला. निरोप समारंभानंतर सचिनने आपल्‍या कुटुंबियांसमवेत हातात तिरंगा घेऊन संपूर्ण वानखेडे स्‍टेडिअमला चक्‍कर मारली. नंतर कर्णधार धोनी आणि विराट कोहलीने त्‍याला आपल्‍या खांद्यावर घेतले. वाचा सचिनचे मनोगत, त्‍याच्‍याच शब्‍दात



विंडीजकडून दिनेश रामदीनच्‍या नाबाद 53 धावा सर्वोच्‍च ठरल्‍या. त्‍याखालोखाल चंद्रपॉल 41 आणि ख्रिस गेल 35 धावा यांनाच विकेटवर थोडा काळ थांबता आले. अधिक वाचण्‍यासाठी क्लिक करा पुढच्‍या स्‍लाईडला...