आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सचिनच्‍या भावना त्‍याच्‍याच शब्‍दांत, वाचा...

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सचिन तेंडुलकरने व्‍यक्‍त केलेल्‍या भावना त्‍याच्‍याच शब्‍दांत, 'हा क्षण माझ्यासाठी खूप भावूक आहे. आतापर्यंतचा क्रिकेटमधील प्रवास संपतोय यावर विश्‍वास ठेवणे मला कठीण जात आहे. आभार मानण्‍यासाठी माझ्याकडे मोठी यादीच आहे. यामध्‍ये सर्वात प्रथम नाव येते ते माझ्या वडीलांचे. 1999 साली त्‍यांनी हे जग सोडले. त्‍यांच्‍या मार्गदर्शनाशिवाय मी तुमच्‍यासमोर उभा राहू शकला नसतो. 'तु तुझ्या स्‍वप्‍नांचा पाठलाग कर. मार्ग खडतर आहे. पण कधीही निराश होऊ नकोस,' असा सल्‍ला त्‍यांनी मला दिला होता. आज त्‍यांची मला खूप आठवण येतेय.

माझी आई, मला माहित नाही, तिने माझ्यासारख्‍या खोडकर मुलाला कसं सांभाळलं. मी खेळायला सुरूवात केल्‍यापासून तिने देवासमोर फक्‍त प्रार्थनाच केली आहे. शाळेत असताना क्रिकेटसाठी चार वर्षे मी माझ्या काका आणि काकूंकडे राहिलो. त्‍यांनी त्‍यांच्‍या मुलासारखे मला वागवले. माझा मोठा भाऊ नितीनने मला म्‍हटलं होतं, तु जे काही करशील त्‍यासाठी तू तुझे 100 टक्‍के देशील याची खात्री आहे. बहिण सविताने मला सर्वात प्रथम बॅट भेट दिली होती. मी जेव्‍हा बॅटिंग करतो तेव्‍हा ती अजूनही उपवास करते. भाऊ अजितने माझ्यासाठी स्‍वत:च्‍या करिअरकडे दुर्लक्ष केले. त्‍यानेच मला आचरेकरसरांकडे नेले होते. एवढंच काय काल रात्रीही माझ्या बाद होण्‍यावर त्‍याने माझ्याशी चर्चा केली. मी खेळत नसलो तरी तो माझ्याशी क्रिकेटच्‍या तंत्राबद्दल बोलत असतो. अधिक वाचण्‍यासाठी क्लिक करा पुढच्‍या स्‍लाईडला...