भारतरत्न आणि मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचे आत्मचरित्र 'प्लेइंग इट माय वे' आज (बुधवारी) सायंकाळी प्रकाशित झाले. मातृभक्त सचिनने पुस्तकाची पहिली प्रत आईला भेट दिली. तेव्हा सचिनच्या आईचा चेहरा अभिमानाने फुलला होता.
मुंबईत झालेल्या या कार्यक्रमात सचिन तेंडुलकरच्या आत्मचरित्राचे प्रकाशन झाले. यावेळी सचिनसह भारतीय संघाचा माजी कर्णधार सौरव गांगुली,
राहुल द्रविड आत्रर व्हीव्हीएस लक्ष्मण उपस्थित होते. चारही माजी क्रिकेटपटूंनी क्रिकेटच्या तसेच आयुष्याच्या मैदानावरील अनुभव सांगितले.
व्यासपीठावर सचिनची पत्नी अंजली आणि थोरला भाऊ अजित तेंडुलकर उपस्थित होता. सचिनने क्रिकेटमधून निवृत्त घेतल्यानंतरही त्याने कशाप्रकारे फलंदाजी करायला हवी, असे अजित तेंडुलकर याने सांगितले.
अंजलीने सांगितले की, तिने सचिनला पहिलादा पाहिले तेव्हा तो 17 वर्षांचा होता. सचिन काय करतो, हेदेखील अंजलीला तेव्हा माहीत नव्हते. विशेष म्हणजे
विवाहाची बोलणी करण्यासाठी अंजली स्वत: सचिनच्या आई-वडीलांना भेटायला गेली होती. तेव्हा सचिन न्यूझीलंडच्या दौर्यावर होता.
सचिन म्हणाला की, आपले आत्मचरित्र लिहिण्यासाठी त्याला तीन वर्षांचा कालावधी लागला. त्यामुळे आता यात कोणताही बदल केला जाणार नाही.
दरम्यान, सचिनने आपल्या '
फेसबुक' आणि '
ट्विटर पेज'वर लिहिले आहे की, माझ्या आत्मचरित्राची पहिली प्रत मी आईला भेट दिली आहे. यावेळी आई खूप भावूक झाली होती. तरीदेखील तिचा चेहरा प्रफुल्लीत दिसत होता आणि तिच्या चेहर्यावर अभिमान होता. सचिनने त्याच्या आईसोबतचा फोटोही सोशल साइटवर शेअर केला. ज्यामध्ये सचिनच्या आईच्या हाती पुस्तक असून तिच्या चेहर्यावर स्मित आहे.
पुढील स्लाइड्सवर वाचा, काय आहे सचिनच्या पुस्तकात?