आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सचिन टॉप गिअरमध्ये फलंदाजी करणार !

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अ‍ॅडलेड - स्टर-ब्लास्टर सचिन तेंडुलकरने येत्या 24 जानेवारीपासून सुरू होत असलेल्या अ‍ॅडलेड कसोटी सामन्यात टॉप गिअरमध्ये फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. या सामन्यात तो रक्षात्मक धोरणाऐवजी आक्रमक फलंदाजी करून गोलंदाजांवर दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न करीन. महाशतक ठोकणे हे त्याचे लक्ष नसून, संघाला विजयाच्या ट्रॅकवर परत आणण्यासाठी तो असे करणार आहे.
भारतीय क्रिकेट संघाच्या एका सदस्याने नाव न प्रकाशित करण्याच्या अटीवर ही माहिती दिली. पुढच्या कसोटीसाठी सचिन खूप उत्साहित आहे, असे त्याने सांगितले. महाशतकामुळे त्याच्यावर होणाºया टीकेकडे सचिनचे दुर्लक्ष आहे. सचिनने जर चुकून या सामन्यात शतक ठोकलेच तर त्याचे लक्ष द्विशतक ठोकण्याचे असेल. कारण, त्याला कोणत्याही परिस्थितीत संघाला विजयी करायचे आहे, असेही या सदस्याने सांगितले.
सचिन सर्वाधिक यशस्वी
सध्याच्या आॅस्ट्रेलिया दौºयात संघातील इतर फलंदाजांच्या तुलनेत सचिन अधिक यशस्वी ठरला आहे. सचिनने या मालिकेतील सहा डावात 41.50 च्या सरासरीने 249 धावा काढल्या आहेत. आतापर्यंत झालेल्या तीन कसोटीत त्याने दोन अर्धशतके ठोकली आहेत. असे असताना सुद्धा त्याच्यावर फॉर्मात नसल्याची टीका होत आहे. यामुळेच बहुदा सचिन शतकापर्यंत पोहोचण्यात अपयशी ठरत आहे. संघाचे प्रशिक्षक डंकन फ्लेचर यांनी सचिनला मनमोकळेपणाने फलंदाजी करण्याचा सल्ला दिला आहे.