आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Saeed Ajmal Hints At Conspiracy After India Defeat

Ind-Pak : पंचांच्‍या निर्णयावर अजमलने ओकली गरळ, चुकीच्‍या निर्णयाने हरला पाक!

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लाहाेर - विश्‍वचषकातील पहिल्‍याच लढतीत भारत-पाकिस्‍तान यांच्‍यात झालेल्‍या सामन्‍यामध्‍ये उमर अकमल डीआरएस पध्‍दतीने बाद झाला. परंतु, पाकिस्तानचा स्टार ऑफ स्पिनर सईद अजमलने याविषयी आवाज उठविला आहे. एवढेच नव्‍हे तर पंच स्टीव डेविस यांनी पाकिस्‍तानसोबत भेदभाव केला असल्‍याचा आरोप केला आहे. अकमल बाद झाल्‍यानंतर अजमलने एका पाकिस्‍तानी वृत्‍तवाहिनीला मुलाखत देताना हे आरोप लावले.
पंच स्टीव डेविस हे पाकिस्‍तानसोबत भेदभावजनक निर्णय देतात, एवढेच नाही तर त्‍यांनी माझ्यासोबतही असा भेदभाव केला होता. डेविस पाक संघाच्‍या सामन्‍यास पंच नसावेत ही आमची मागणी असूनही आमचे कुणी ऐकत नसल्‍याचेही अजमल म्‍हणाला. पंचांच्‍या चूकीच्‍या निर्णयामुळेच पाक संघ पराभूत झाल्‍याचे अजमलने म्‍हटले आहे.

पाकिस्तानच्‍या माजी क्रिकेटपटूंनीही उठविला आवाज
सामन्‍यानंतर एका टीव्‍ही चॅनलसोबत दिलेल्‍या मुलाखतीत पाकिस्‍तानचा माजी क्रिकेटपटू आणि समालोचक रमीज रजा यांनी अकमलला बाद देण्‍यावरून असंतोष व्‍यक्‍त केला होता. तर माजी वेगवान गोलंदाज सरुराज नवाजने डेविसच्‍या निर्णयावर शंका उपस्थित केली.
काय आहे प्रकरण ?
रविवारी भारत-पाक सामन्‍यादरम्‍यान रवींद्र जडेजाच्‍या चेंडूवर विकेटकीपर धोनीने विकेटच्‍या पाठीमागे झेल घेतला. परंतु, पंचानी भारताची अपील नाकारली. तेव्‍हा धोनीने डीआरएसचे सहाय्य घेण्‍याचे ठरविले. डीआरएसद्वारे थर्ड अंपायर स्टीव डेविसने अकमलला झेलबाद दिले.
काय आहे डीआरएस?
डीआरएसच्‍या नियमानुसार, कोणताही संघ पंचांनी दिलेल्‍या निर्णयाविरुध्‍द दोन अपील करु शकतो. पहिला अपिल पंचांचा निर्णय चूकीचा ठरवणारा असेल तर संघ पुन्‍हा एक निर्णय घेऊ शकते. जर तुमची अपील चूकीची असेल आणि पंचांचा निर्णय योग्‍य असेल तर आपणास दुसरे अपिल करता येत नाही.
भ्‍ाारताचा विरोध
भारताने डीआरएसचा (डिसिजन रेफरल सिस्टम) विरोध केला आहे. जेव्‍हा भारताविरुध्‍द कोणता सामना भारतात खेळल्‍या जात असेल तर तेथे डीआरएस नियम लागू होत नाही. परंतु, विश्‍वचषकात हा नियम लागू आहे.
पुढील स्‍लाइडवर वाचा, स्‍वत:च प्रश्‍नांच्‍या गराड्यात आहे अजमल..