आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अजमलच्‍या फिरकीत फसले इंग्‍लंड, 192 धावांत संपला पहिला डाव

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

दुबई- फिरकीपटू सईद अजमलच्‍या ( 7/55) जबरदस्‍त गोलंदाजीसमोर इग्‍लंड संघाचा पहिला डाव 192 धावांवर आटोपला. इंग्‍लंडकडून यष्‍टीरक्षक फलंदाज मॅट प्रायर 70 धावांवर नाबाद राहिला.
घरच्‍या मैदानावर टीम इंडियाला 4-0 ने पराभूत करणा-या इंग्‍लंडची सईद अजमलने दुरावस्‍था केली. आपल्‍या ऑफस्पिनवर त्‍याने इंग्‍लंडच्‍या फलंदाजांना तंबूचा रस्‍ता दाखवला.
इंग्‍लंडने 94 धावांवरच आपले सात गडी गमावले होते. परंतु, यष्‍टीरक्षक फलंदाज मॅट प्रायरने शानदार अर्धशतक लगावून संघाला सन्‍मानजनक धावसंख्‍येवर पोहोचवले.
इंग्‍लंडचा पहिला डाव
इंग्‍लंडचा कर्णधार अँड्रयू स्‍ट्रॉसने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्‍याचा निर्णय घेतला. परंतु, त्‍याचा निर्णय अजमलने खोटा
ठरवला. मोहंमद हाफीजने इंग्‍लंड संघाला पहिला धक्‍का दिला. त्‍यानंतर फलंदाजांनी खेळपट्टीवर येऊन हजेरी लावण्‍याचेच काम केले. मॅट प्रायरला ग्रीम स्‍वानने चांगली साथ दिली. 34 धावांवर अब्‍दुर रहमानने त्‍याला बाद केले. त्‍यानंतर इंग्‍लंडचे शेपूट बाद करण्‍यात पाकिस्‍तानला यश आले.
अजमलने 55 धावांच्‍या बदल्‍यात सात गडी टिपले. कसोटी कारकीर्दीतील त्‍याचे सर्वश्रेष्‍ठ प्रदर्शन ठरले.