आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘साई’चे खेळाडू 66 लाखांच्या उपकरणांनी होणार ‘फिट’

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या परिसरातील भारतीय क्रीडा प्राधिकरणाचे फिटनेस सेंटर (जिमखाना) लवकरच विदेशी कंपनीच्या 66 लाखांच्या उपकरणाने परिपूर्ण होणार आहे. केंद्रीय क्रीडा मंत्रालयाची या उपकरणे खरेदीच्या प्रस्तावाला मान्यता मिळाली असून, येत्या ऑगस्टमध्ये ही उपकरणे जिमखान्यात येण्याची शक्यता आहे.


क्रीडा मंत्रालयाच्या मान्यतेनंतर तब्बल 3 कोटी 69 लाख रुपये खर्च करून देशभरातील साई सेंटरमध्ये जिमखान्यासाठी साहित्य खरेदी केले जात आहे. यामध्ये ट्रेडमिल, एक्सरसाइझ सायकलसह टर्सोसारख्या उपकरणांचा समावेश आहे.
ज्युनियर तिरंदाजी संघाचे शिबिर औरंगाबादेत? : साईमध्ये भारताच्या ज्युनिअर तिरंदाजी संघाच्या प्रशिक्षण शिबिराचे आयोजन केले जाण्याची शक्यता आहे. शिबिराला 15 जुलैपासून प्रारंभ होईल. रिकर्व्ह प्रकारातील 20 तिरंदांजाचा समावेश असेल.


लवकरच सबसेंटरचा दर्जा
औरंगाबाद येथील भारतीय क्रीडा प्राधिकरणाच्या (साई) केंद्राला सबसेंटरचा दर्जा मिळण्याची शक्यता आहे. याचा प्रस्ताव दिल्ली मुख्य कार्यालयाकडे पाठवण्यात आला आहे. सध्या औरंगाबाद येथील सेंटर हे गांधीनगर साईच्या अखत्यारीत आहे. औरंगाबाद येथे 108 एकरांवर साईचे प्रशस्त असे प्रशिक्षण केंद्र आहे.


सिंथेटिक ट्रॅकला मिळाली मंजुरी
औरंगाबादच्या सेंटरमध्ये लवकरच अ‍ॅथलेटिक्ससाठी सिंथेटिक ट्रॅक दिसणार आहे. या ट्रॅकच्या प्रस्तावाला फेबुवारी 2013 मध्ये मंजुरी मिळाली आहे. ऑक्टोबरमध्ये आठ लेंथच्या सिंथेटिक ट्रॅकचे काम सुरू होणार आहे.


अ‍ॅस्ट्रो टर्फला ग्रीन सिग्नल
हॉकीसाठी प्रशस्त अत्याधुनिक पद्धतीचे अ‍ॅस्ट्रो टर्फ असलेले मैदान तयार करण्यात येणार आहे. दिल्ली मुख्य कार्यालयाने या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे. याचे काम सप्टेंबरच्या शेवटच्या आठवड्यात सुरू होईल.


खेळाडूंना मोठा फायदा
अत्याधुनिक उपकरणांचा खेळाडूंना मोठ्या प्रमाणात फायदा होईल. खेळातील कामगिरीचा दर्जा उंचावताना फिटनेस चांगला ठेवण्यावर खेळाडूंना भर देता येईल.
वीरेंद्र भांडारकर, सहाय्यक संचालक, साई