आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

औरंगाबादेत ‘साई’ला विभागीय केंद्राचा दर्जा, विनोद तावडेंची घोषणा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - भारतीय क्रीडा प्राधिकरणाचे पश्चिम विभागीय (साई)केंद्र औरंगाबादेत होणार असल्याने आता राज्यातील खेळाडूंना, प्रशिक्षकांना हक्काचे मैदान आणि सर्व सुविधा मिळतील. आजघडीला राज्यातल होतकरू खेळाडू, प्रशिक्षकांना विविध खेळांच्या अत्याधुनिक प्रशिक्षणासाठी आणि एनआयएस कोर्ससाठी बंगळुरू किंवा पतियाळा येथील साईच्या केंद्रावर जावे लागते. मात्र, औरंगाबादेत विभागीय केंद्र झाल्यानंतर या सर्व सुविधा या केंद्रावरच उपलब्ध होतील. खेळाडूंना खेळातील उत्तमक करिअरसाठी भटकावे लागणार नाही. औरंगाबादेतच सर्वोत्तम सुविधा मिळतील.

सोमवारी मुंबईत विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे क्रीडामंत्री विनोद तावडे यांच्या उपस्थितीत औरंगाबादेत साईचे विभागीय केंद्रात करण्यास तत्वत: मान्यता देण्यात आली. या निर्णयामुळे राज्यभरात खेळाडू, प्रशिक्षक, क्रीडाशिक्षकांत आनंदाचे वातावरण तयार झाले आहे.

या बैठकीला साईचे सहायक संचालक वीरेंद्र भंडारकर, शिवछत्रपती पुरस्कार विजेते शिरीष बोराळकर, अवर सचिव ढवळे, सहसंचालक एन.डी. मोटे, उपसंचालक आनंद व्यंकेश्वर, चंद्रकांत कांबळे, मकरंद जोशी, नीरज बोरसे, विनोद नरवडे, हेमेंद्र पटेल, बाबूराव गंगावणे यांची उपस्थिती होती.

अ‍ॅस्ट्रोटर्फ,शूटिंग रेंज शक्य : आताऔरंगाबादेत हॉकीचे अ‍ॅस्ट्रोटर्फ आणि नेमबाजांसाठी आवश्यक सर्व सोयी-सुविधांनी परिपूर्ण शूटिंग रेंज शक्य असल्याचेही या वेळी साईचे सहायक संचालक वीरेंद्र भंडारकर यांनी सांगितले.

औरंगाबाद केंद्राची स्थिती
औरंगाबादेतसध्या साईचे "स्पोर्ट्स ट्रेनिंग सेंटर' आहे. अगदी सुरुवातीला औरंगाबादला सबसेंटरचा दर्जा मिळाला होता. नंतर अपुर्‍या सुविधेमुळे सबसेंटरचा दर्जा काढण्यात आला. २००३ पासून औरंगाबाद हे फक्त "स्पोर्ट्स ट्रेनिंग सेंटर' आहे. येथे आतापर्यंत १०० हून अधिक खेळांचे, राष्ट्रीय संघांचे प्रशिक्षण शिबिर झाले. शिवाय येथे शॉर्टटर्म प्रशिक्षणाची सुविधा आहे.
यामुळे औरंगाबादची झाली निवड
औरंगाबादच्यासाई केंद्राकडे विद्यापीठ परिसरात तब्बल १०१ एकर २९ गुंठे इतकी मोठी जमीन आहे. ही बाजूच औरंगाबादसाठी जमेची ठरली. इतर ठिकाणी साईचे विभागीय केंद्र करायचे ठरले असते तर कोट्यवधी रुपयांची जमीन विकत घ्यावी लागली असती.

पाठपुरावा कामी आला
हे केंद्र औरंगाबादला होण्यासाठी माझ्यासह सर्व क्रीडा संघटक, क्रीडाप्रेमी, खेळाडू प्रयत्नशील होते. आमचे सर्वांचे प्रयत्न कामी आले. या निर्णयामुळे मराठवाड्यात मोठ्या प्रमाणावर खेळाडू घडतील. -शिरीष बोराळकर, शिवछत्रपती पुरस्कार विजेते.

औरंगाबादचा फायदा
हेविभागीय केंद्र आपल्या येथे होणार असल्याने औरंगाबादचा खूप फायदा होईल. खेळातील सर्व आवश्यक आणि अत्याधुनिक सुविधा मिळतील. यामुळे खेळाचा आणि खेळाडूंचा दर्जा सुधारेल. -वीरेंद्र भंडारकर, सहायक संचालक, साई.

- सध्या दोन भव्य इनडोअर हॉल असून टेबल टेनिस, बॉक्सिंग, जिम्नॅस्टिक, बॅडमिंटन आदी इनडोअर खेळांचे प्रशिक्षण याठिकाणी दिले जाते.
- बास्केटबॉलचेही कोर्ट, फुटबॉलचे मैदान आहे.
- अत्यंत दर्जेदार असे जिम उपलब्ध आहे.
- एक मुलांचे, एक मुलींचे आणि एक उच्चस्तरीय अशी तीन वसतिगृहे असून तब्बल ५०० जणांची राहण्याची व्यवस्था
- पाण्याची मुबलक सुविधा आहे. डोंगराच्या पायथ्याशी शेततळ्यात पाण्याची सोय.