आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Saif Ali Khan Mistook Rohit Sharma For Shikhar Dhawan During IPL 8 Opening Ceremony

IPL-8 ओपनिंग: होस्टिंगमध्ये छोट्या नवाबाने केल्या अनेक चुका, पाहा VIDEO

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कोलकाता- आयपीएल-8 ची ओपनिंग सेरेमनी मंगळवारी कोलकाता येथील साल्ट लेक स्टेडियम झाली. आधीच पावसाने ओपनिंग सेरेमनीच्या रंगाचा बेरंग केला होता. त्यात बॉलिवूड अभिनेता सैफ अली खान याने होस्टिंगमध्ये अनेक चुका करून कार्यक्रमाची वाट लावली, अशीटिंगल करणार्‍या हजारों कमेंट्‌सचा सोशल मीडियावर अक्षरशः पाऊस पडला आहे.

सैफ अली खानने स्टेजवर आल्यानंतर सगळ्यात आधी सनराइजर्सचा कर्णधार शिखर धवनच्या नामोल्लेख केला. परंतु, सिक्वेंसनुसार, मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्माचे नाव घ्यायला हवे होते. चुकीचे नाव अनाउन्स झालानंतरही रोहित शर्मा स्टेज आला. कारण, पहिल्या नावावर सेटिंग केलेले सॉंग रोहित शर्माच्या नावाने होते. आपली चुक लक्षात येताच सैफने सारवासारव केली.
सोशल मीडियात उडवली टिंगल...
सैफचे होस्टिंग आणि अन्य कलाकारांच्या परफॉर्मंसवर अनेक कमेट्‍स सध्या 'व्हॉट्स अ‍ॅप' आणि 'फेसबुक'सारख्या सोशल मीडियावर फिरताना दिसत आहेत. अनुष्का शर्मा आणि सैफ अली खानला सगळ्यात जास्त टार्गेट केले. सैफची पत्नी आणि अभिनेत्री करीना कपूरवर जोक्स शेअर करण्यात आले. अनुष्का शर्मा आणि विराटलाही युजर्सनी शालजोडे मारले.
पुढील स्लाइडवर क्लिक करून पाहा, आयपीएल-8च्या ओपनिंग सेरेमनीचे निवडक PHOTOS