इंचियोन - ऑस्ट्रेलियन ओपन चॅम्पियन सायना नेहवाल, ग्लासगो राष्ट्रकुल स्पर्धेतील सुवर्णपदक विजेत्या पी. कश्यपचे शुक्रवारी १७ व्या आशियाई स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले. चीनच्या यिहान वांगने महिला एकेरीच्या उपांत्यपूर्व लढतीत सायनाला १८-२१, २१-९, २१-७ ने पराभूत केले. याशिवाय तिने एकेरीची उपांत्य फेरी गाठली. भारताचा युवा खेळाडू पी. कश्यपला पुरुष गटातील प्री-क्वार्टर फायनलमध्ये पराभवाला सामोरे जावे लागले. त्याला जगातील नंबर वन ली चोंग वेईने २१-१२, २१-११ ने धूळ चारली.
मिश्र दुहेरीतही भारताच्या बी. सुमीत रेड्डी आणि मनू अत्रीला पराभवाला सामोरे जावे लागले. भारताच्या या जोडीला सिंगापूरच्या डॅनी बावा क्रिसनांटा आणि यू यान वेनिसा नियोने धूळ चारली. या जाेडीने २१-१८, २१-२३, २१-१५ अशा फरकाने सामना जिंकला.