आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

जागतिक बॅडमिंटन स्पर्धा: सायना तिसर्‍या फेरीत दाखल !

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

ग्वांगझू - जागतिक बॅडमिंटन स्पध्रेत बुधवारी आपला पहिला सामना अवघ्या 23 मिनिटांत जिंकून आपण जबरदस्त फॉर्मात असल्याचे सायना नेहवालने सिद्ध केले आहे. पी.व्ही. सिंधूनेसुद्धा चॅम्पियनशिपमध्ये विजयी सुरुवात केली. पहिल्या फेरीत पुढे चाल मिळाल्यानंतर या दोन्ही खेळाडूंनी प्री क्वार्टर फायनलमध्ये प्रवेश केला आहे. दुसरीकडे अजय जयराम आणि तरुण कोना, अरुण विष्णू यांचा पराभव झाला. यानंतर चेक गणराज्यच्या पेत्र कोकलने सामन्यातून माघार घेतल्याने पारुपल्ली कश्यपला विजयी घोषित करण्यात आले. आता त्याचा सामना हाँगकाँगच्या यून हूशी होईल.

तिसरी मानांकित सायनाने महिला एकेरीतील दुसर्‍या फेरीत रशियाच्या ओल्गा गोलोवानोवाला 21-5, 21-4 ने पराभूत केले. तिने सामन्यात आठ स्मॅश विनर, चार नेट विनर आणि दहा क्लिअर विनर मारले. जागतिक क्रमवारित 66 व्या क्रमांकावर असलेल्या गोलोवानोवाला संपूर्ण सामन्यात फक्त 9 गुण मिळवता आले. आता सायनाचा सामना 15 वी मानांकित थायलंडच्या पोर्नटीप बुरानाप्रासर्तसुक हिच्याशी होईल. तिच्याविरुद्ध सायनाचा 5-0 असा विजयी रेकॉर्ड आहे.

सिंधूची काओरीवर मात
दहावी मानांकित सिंधूने जपानच्या काओरी इमाबेप्पूला एक तास आणि 11 मिनिटांच्या संघर्षानंतर पराभूत केले. सिंधूने 21-19, 19-21, 21-17 ने विजय मिळवून संघर्ष संपवला. सिंधूने 42 स्मॅश विनर आणि 17 नेट विनर मारले. जागतिक क्रमवारीत 12 व्या स्थानी असलेल्या सिंधूचा सामना आता दुसरी मानांकित चीनच्या यिहान वांगशी होईल. यात तिच्याकडून विजयाची आशा आहे.