आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Saina Failed In Thailand Grapry Gold Badmintob Competition

थायलंड ग्रांप्री गोल्ड बॅडमिंटन स्पर्धेत सायनाचे स्वप्न भंगले

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बँकॉक- गतविजेती व अव्वल मानांकित सायना नेहवालचे स्वप्न अवघ्या 53 मिनिटांत भंगले. तिला थायलंड ग्रांप्री गोल्ड बॅडमिंटन स्पर्धेच्या उपांत्यपूर्व लढतीत अनपेक्षितपणे पराभवाचा सामना करावा लागला. आठव्या मानंकित जुआन गुने लढतीत सायनाला पराभूत केले. तिने 13-21, 21-12, 21-18 अशा फरकाने सामना जिंकला.

भारताचा खेळाडू के. श्रीकांतने शुक्रवारी थायलंड ग्रांप्री गोल्ड बॅडमिंटन स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला. त्याने उपांत्यपूर्व लढतीत कोरियाच्या वान हो सोनचा 21-17, 21-18 अशा फरकाने पराभव केला. 13 व्या मानांकित श्रीकांतसमोर सेमीफायनलमध्ये थायलंडच्या थमासिन सित्तिकोमचे तगडे आव्हान असेल. थायलंडच्या खेळाडूने उपांत्यपूर्व लढतीत जेन हाओ सूला 21-17, 21-12 ने पराभूत केले.